Majhi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

CM Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ६ लाखांवर अर्ज

Government Scheme Update : शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही जिल्ह्यात या योजनेची प्रचार, प्रसिद्धी सुरू असून, ७ ऑगस्टपर्यंत ६ लाख १४ हजार ९७० अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एक ही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करत आहे.

ग्राम स्तरावर अशा सेविका ग्रामसेवक त्यांच्याकडे अर्ज प्राप्त होत आहेत. तर महा-ई-सेवा केंद्राद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज अपलोड केले जात आहेत. विविध विभागाच्या वतीने ही योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्रुटीच्या पूर्ततेनंतर पुन्हा अर्ज घेणार

सर्व अर्जांची छाननी तालुकास्तरीय तपासणी समितीने केली असून, यातील ५ लाख ४८ हजार ६५९ अर्ज समितीने जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत, तर ५९ हजार ३८९ अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रद्द करण्यात आले आहेत.

कोणत्या कागदपत्रांची कमतरता आहे, याविषयी संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर त्रुटी सांगितली आहे. रद्द केलेल्या अर्जांवर संबंधित लाभार्थ्यांनी त्रुटीबाबतचे कागदपत्र अपलोड केल्यास त्यांचे अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT