Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’अंतर्गत सात लाख अर्ज

Radhakrishna Vikhe Patil : शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon
Published on
Updated on

Nagar News : ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आतापर्यंत सात लाख अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, जवळपास १ लाख ५० हजार अर्ज मंजूर झाले आहेत. शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

नगर येथे महसूल पंधरवड्यानिमित्त १८९ नवनियुक्त तलाठ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३) नियुक्ती आदेश दिले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी आधार कार्ड लिंक बॅंक खाते नंबर द्या’

विखे पाटील म्हणाले, की महसूल विभाग हा सर्वांत मोठा विभाग असून, या विभागात तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे. या विभागाचा सर्व ठिकाणी संबंध आहे. त्यामुळे नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठ्यांनी विभागात लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे. जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवावा.

Radhakrishna Vikhe Patil
Majhi Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’साठी ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज

जनतेला तत्काळ व विनाविलंब सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करावे. शासन गतिमान असून सर्व सामान्यांचे आहे. लोकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाइन मिळाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.

महसूल विभागात जमिनीच्या मोजण्या रोअर मशिन प्रणालीमुळे जलदगतीने होत आहेत. मोजणीनंतर ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उतारा उपलब्ध होत आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असून जनतेला सेवा उपलब्ध झाली आहे, असेहे विखे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com