Yavatmal News : सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सर्वत्र घाई सुरू आहे. मात्र या संधीचा गैरफायदा घेऊन सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना आणि किसान सन्मान योजनेची बोगस लिंक व्हायरल होत आहे. यातून अनेकांची फसगत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
आजच्या आधुनिक काळात वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान पुढे येत आहे. यातून चांगल्या गोष्टींनाही चालना मिळत आहे. परंतु बोगस, फसवेगिरी, लुबाडणूक करण्याचा प्रकारसुद्धा कमालीचा वाढला आहे. यावर सायबर सेलच्या माध्यमातून पायबंद घालण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतात. मात्र, अनेकजण सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलताना दिसून येतात. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली.
या योजनेत २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना अर्ज भरता येतो. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिलांची गर्दी सर्वत्र दिसून येत आहे. तर योजना जाहीर होताच सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहे. सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेसह शेतकरी सन्मान योजना, ऑनलाइन कर्ज आदींच्या बोगस लिंक व्हायरल केल्या जात आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर चक्क मोबाइल हॅक होत असून, मोबाईलमधील संपूर्ण संपर्कावर लिंक पाठवल्या जात आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्या जात आहे. यावर पायबंद बसवण्यासाठी सायबर सेल वेगवेगळ्या प्रकारे पावले उचलते. परंतु प्रत्येक वेळी विलंबाने दाखल होणाऱ्या तक्रारीमुळे फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
उमरखेड शहरातील महात्मा गांधी वॉर्डात राहणाऱ्या नितीन कऱ्हाडे यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. मोबाइलवर आलेली लिंक त्यांनी उघडली असता त्यांचा मोबाइल हॅक झाला. अवघ्या मिनिटातच त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाहून मॅसेज पाठविणे सुरू झाले होते. ही बाब लक्षात येताच त्यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नंतर सायबर सेलमध्येसुद्धा तक्रार देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.