Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : चितळे डेअरी दूध उत्पादकांच्या खात्यावर ६ कोटी रुपये जमा

Chitale Dairy : शासनातर्फे दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान योजनेत जनावरांच्या टॅगिंगसह सर्व प्रस्ताव तपासणीनंतर चितळे डेअरीच्या मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ५२ हजार ९५१ शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले.

Team Agrowon

Sangli News : भिलवडी (जि. सांगली) येथील बी. जी. चितळे डेअरीच्या ५२ हजार ९५१ दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति लिटर पाच रुपये अनुदानांतर्गत ६ कोटी ०८ लाख ७८ हजार ५९० रुपये इतके अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे यांनी दिली.

श्री. चितळे म्हणाले, की शासनातर्फे दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान योजनेत जनावरांच्या टॅगिंगसह सर्व प्रस्ताव तपासणीनंतर चितळे डेअरीच्या मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ५२ हजार ९५१ शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले.

त्यानुसार या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ कोटी ०८ लाख ७८ हजार ५९० रुपयांइतके अनुदान १२ एप्रिलअखेर जमा करण्यात झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. १५ एप्रिल पूर्वी परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यास या उत्पादकांना अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

जनावरांच्या टॅगिंगसह अनुषंगिक माहिती ऑनलाइनवर वेळेत भरण्याचे काम चितळे डेअरीच्या पशुसंवर्धन व विस्तार विभाग, दूध संकलन विभाग तसेच अकाउंट्स विभागातील अंदाजे ७० कर्मचाऱ्यांनी केले. उर्वरित जनावरांचे टॅगिंग चितळे डेअरी मार्फत सुरू ठेवण्यात येणार आहे. पूर्ण प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम थेट लाभ हस्तांतरणा‌द्वारे शासनाकडून तत्काळ जमा करण्यात आली.

ही योजना ११ जानेवारी ते १० मार्च अखेर राबविण्यात आली. योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जनावरांच्या टॅगिंगवर भर दिल्यामुळे व योग्य मार्गदर्शन केल्याने पात्र शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोचले.

महाराष्ट्र राज्यातील खासगी व सहकारी दूध संघाना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळाला. दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांच्या प्रयत्नाने जनावरांचे वेळेत टॅगिंग होऊन अनुदान मिळण्यास मदत झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT