Satara News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये जिल्ह्यातील ८२ हजार २६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ८९ लाख दुधाचे अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत ८५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व इतर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर अनुदान जमा करणार असल्याचे संबंधित विभागाने सांगितले. या अनुदानामुळे ऐन दुष्काळात दिलासा मिळाला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळण्यासाठी ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाने पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास अडथळे येत होते. जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यात दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत.
अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांनाही अनुदानाचा लाभ देला जात आहे. याचबरोबर एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुदत वाढविली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ऑनलाइन प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा काळात शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी (रुपयांत)
एकूण लाभ मिळालेले शेतकरी ८२ हजार २६१
एकूण जनावरे दोन लाख ८४ हजार ८५०
अनुदान मिळालेले दूध दोन कोटी ७८ लाख ३६ हजार ८८४
मिळालेले अनुदान १३ कोटी ८९ लाख ७९ हजार ६३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.