Soybean and Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Subsidy : सांगलीतील शेतकऱ्यांना सहा कोटींचे अनुदान

Agriculture Subsidy : सोयाबीन व कापूस पिकास एका हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार, अशी घोषणा यापूर्वीच सरकारने केली होती. २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामात कापूस, सोयाबीन पिकाची लागवड करून ई-पीकपाहणी केलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य योजनेतून ६ कोटी १७ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या नावावर जमा झाली आहे. जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

सोयाबीन व कापूस पिकास एका हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार, अशी घोषणा यापूर्वीच सरकारने केली होती. २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय झाला होता.

खरीप हंगामात २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन पीक लागवड करून त्याची ई-पीकपाहणी ऑनलान केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अर्थसाह्य योजनेतून पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एक हेक्टर कापूस पिकाला पाच हजार, तर एक हेक्टर सोयाबीन पिकाला पाच हजार असे अनुदान निश्वित करण्यात आले. अर्थसाह्य योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ११ ऑगस्टपासून प्रत्येक गावात कृषी सहायकांनी योजनेची यादी लावली आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचा कुठलाही खर्च होणार नाही, याची दक्षता शासनाने या योजनेत घेतली होती. गावात लावलेल्या यादीत नाव असल्यास केवळ आधार कार्डची झेरॉक्स व शासनाने निर्धारित केलेले प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी भरून कृषी सहायकांकडे देण्यात आले होते.

गावात लावलेल्या यादीत आपले नाव असल्यास शेतकऱ्यांनी केवळ आधार कार्डची झेरॉक्स व प्रतिज्ञापत्र उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मवर लाभार्थी शेतकऱ्याचे नाव, कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र व स्वाक्षरी करून देण्यात आली.

जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत म्हणून कृषी विभागाद्वारे ०.२ हेक्टरहून कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार व त्याहून अधिक क्षेत्रासाठी (दोन हेक्टरच्या मर्यादेत) पाच हजार रुपये मदत पात्र उत्पादकांच्या खात्यात जमा केली आहे. हा पहिला टप्पा आहे. संमतीपत्र येईल तसे राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर जमा केले जाईल.
- विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT