Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Dispute : शेतरस्त्यांची ५६० प्रकरणे सामंजस्याने निकाली

Farm Road Issue : छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठही जिल्ह्यात आयोजित सस्ती अदालतीमध्ये एकूण १२८० प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ५६० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : सस्ती अदालत उपक्रमामुळे समूपदेशनातून मराठवाड्यातील तब्बल ५६० शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. प्रशासन थेट बांधावर पोचल्याने शेतरस्ते मोकळे करून देण्यात यश आले आहे.

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते तसेच पाणंद रस्ते मोकळे करण्यासोबतच प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी सर्व तालुक्यात सस्ती अदालत उपक्रम विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या पुढाकारातून सुरू झाला.

विभागात ९ मे रोजी प्रथम सस्ती अदालत व २३ मे रोजी दुसरी सस्ती अदालत तहसिल कार्यालयात तसेच गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात आली. सस्ती अदालतीमध्ये काही प्रकरणात प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थळ पाहणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनीदेखील अदालतीमध्ये ऑनलाइन सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला.

शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून दोनशे रुपयात शेताच्या हद्दीची मोजणी या निर्णयाला गती देण्यासाठी विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी विभागातील आठही जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त यांनी बैठक घेतली आहे. सस्ती अदालती मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्राप्त झाली.

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठही जिल्ह्यात आयोजित सस्ती अदालतीमध्ये एकूण १२८० प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ५६० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणात देखील यापुढील सस्ती अदालतीमध्ये समुपदेशन करुन सामंजस्याने प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याचे विभागीय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सस्ती अदालतीमध्ये तहसीलदार स्तरावर गरजू शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे सामंजस्याने व समुपदेशन करून सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या पावसाळा सुरु होणार असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी शेतात उपकरणे ने आण करणेसाठी रस्ता नसल्याने येणाऱ्या अडचणी देखील कमी होत आहेत. यामुळे गरजू शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अदालतीचा गरजू शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी केले आहे.

जिल्हानिहाय प्राप्त, निकाली व शिल्लक प्रकरणे

छत्रपती संभाजीनगर- प्राप्त१४१ निकाली ४४ शिल्लक प्रकरणे ९७

जालना - प्राप्त १०९, निकाली ३८ तर शिल्लक प्रकरणे ७१

परभणी- प्राप्त २४२, निकाली १४२ तर शिल्लक प्रकरणे १००

हिंगोली- प्राप्त ६१, निकाली २५ तर शिल्लक प्रकरणे ३६

नांदेड- प्राप्त १५३, निकाली ५९ तर शिल्लक प्रकरणे ९४

बीड- प्राप्त १२८, निकाली ५३ तर शिल्लक प्रकरणे ७५

लातूर- प्राप्त २७८, निकाली १६२ तर शिल्लक प्रकरणे ११६

धाराशिव- प्राप्त १६८, निकाली ३७ तर शिल्लक प्रकरणे १३१

एकूण- प्राप्त १२८०, निकाली ५६० तर शिल्लक प्रकरणे ७२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT