Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Insurance Scheme : रब्बी पीक विमा योजनेत साडेपाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग

Farmer Participation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५३९ शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामातील ७ लाख ८१ हजार २६०.८० हेक्टर क्षेत्र पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षित केले आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५३९ शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामातील ७ लाख ८१ हजार २६०.८० हेक्टर क्षेत्र पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षित केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत सुमारे ६१.४४ टक्के शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यातून ५ लाख ४९ हजार ५३९ शेतकऱ्यांचे १३ लाख ५२ हजार ८०४ अर्ज आले. त्यामध्ये बिगर कर्जदार १३ लाख ३४ हजार ९४० तर कर्जदार १७ हजार ८६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

१५ डिसेंबर पर्यंत आपले रब्बी पीक विमा संरक्षित करण्याची संधी शेतकऱ्यांना होती. गतवर्षीच्या हंगामात सुमारे २२ लाख १ हजार ७८१ शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. यंदा ती संख्या कमालीची घटल्याची दिसते आहे. यंदाच्या रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर आहे.

त्या तुलनेत ८ लाख ६८ हजार ६४० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. प्रत्यक्ष पेरणी झालेली क्षेत्र व शेतकऱ्यांनी घेतलेले पीक विमा संरक्षण पाहता पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ८७ हजार ३८३ हेक्टर क्षेत्र यंदा विमा संरक्षणाखाली येऊ शकले नाही हे स्पष्ट होते आहे.

जिल्हानिहाय सहभागी शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी संरक्षित क्षेत्र

छ. संभाजीनगर २२९६५३ १६८९२८.४४

जालना १००८८९ ३०५३०१.२२

बीड २१८९९७ ३०७०३०.६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production Decline: अतिवृष्टीचा फटका ऊसाला; राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार!

Rain Update : पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमीच राहणार

Kharif Paisewari : नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे

Fish Farming : अतिवृष्टीचा मत्स्य व्यावसायिकांना मोठा फटका

PM Dhan Dhaanya Krishi Yojana: पीएम धन-धान्य कृषी योजनेसाठी देशातील १०० जिल्ह्यांची निवड, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

SCROLL FOR NEXT