Rabi Crop Insurance Scheme : रब्बी पीकविमा योजनेत २८ लाख शेतकरी सहभागी

Agricultural Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेत या वर्षी २८ लाख ४५ हजार ६२ शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे मिळून ५४ लाख ४८ हजार ४७३ अर्ज केलेले असून, ३९ लाख ९९० हजार ४३० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेत या वर्षी २८ लाख ४५ हजार ६२ शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे मिळून ५४ लाख ४८ हजार ४७३ अर्ज केलेले असून, ३९ लाख ९९० हजार ४३० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. रब्बी हंगामासाठी राज्यात १७ हजार २६ कोटी ३७ लाख रुपये संरक्षित झाले आहेत.

गेल्या वर्षी ३५ लाख ९० हजार २४२ शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी ७१ लाख ९० हजार ४५१ अर्जांतून ५० लाख ३ हजार ६४० हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा काहीसा सहभाग कमी दिसत आहे.

Crop Insurance Scheme
PM Crop Insurance Scheme : राज्यात पीक विम्यासाठी ४१ लाख अर्ज

आतापर्यंत २८ लाख ४५ हजार ६२ शेतकऱ्यांनी विविध पिकांचे मिळून ५४ लाख ४८ हजार ४७३ अर्जातून ३९ लाख ९९० हजार ४३० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. यंदा रब्बीसाठी राज्यात १७ हजार २६ कोटी ३७ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. सरकारकडून विमा कंपन्याला यंदा १६६५ कोटी ९३ लाखांचा विमा हप्ता जाणार आहे.

यंदाही सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यात अर्जाची संख्या अधिक आहे. त्यापाठोपाठ बीड, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर जिल्ह्यांत सहभागी शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षीही योजनेला प्रतिसाद मिळाला होता.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme : रब्बी हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजना

गेल्या वर्षी ३५ लाख ९० हजार २४२ शेतकऱ्यांनी १ कोटी ७० लाख ७८ हजार अर्जांतून १ कोटी १३ लाख ३८ हजार ३४० हेक्टर क्षेत्रांवर वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवला होता. ७१ लाख ९० हजार ४५१ अर्जांतून ५० लाख ३ हजार ६४० हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला होता. गेल्या वर्षीही २० हजार १५४ कोटी ६९ लाख ३२ हजार संरक्षित झाले होते.

सहभागी शेतकरी (कंसात हेक्टर क्षेत्र)

अहिल्यानगर ः २,४६,३९१ (३ लाख १ हजार), अकोला ः ८७,७७१ (१ लाख ४३ हजार), अमरावती ः ३६,८७२ (५९ हजार), बीड ः २,२९,५५२ (३ लाख ६ हजार ३५०), भंडारा ः २,००४ (२९२), बुलडाणा ः २,१८,८०४ (३ लाख १९ हजार ७८०). चंद्रपूर ः १४,२९६ (२८ हजार ४५०), छत्रपती संभाजीनगर ः १,३६,५५१ (१,६७,५५०), धाराशिव ः १,४६,७१४ (२ लाख ३७ हजार १७०),

धुळे ः ३९,५९२ (५७ हजार ४५०), गडचिरोली ः ३०८ (४५०), गोंदिया ः १,०१९ (१ हजार २७०), हिंगोली ः ७५,४९२ (१ लाख ६ हजार ७६०), जळगाव ः ९९,७९७ (१ लाख ३९ हजार ६९०), जालना ः २,३१,५१२ (३ लाख ४ हजार ४८०), कोल्हापूर ः १,११३ (५७०), लातूर ः २,१७,१२४ (३ लाख ११ हजार ८९०), नागपूर ः ३६,४४८ (६५ हजार ६०), नांदेड ः २,२६,८०९ (२ लाख ८८ हजार २९०),

नंदुरबार ः ७,६२६ (१२ हजार ८००), नाशिक ः १,४४,५५५ (१ लाख ८८ हजार ९०), परभणी ः २,६६,९०६ (३ लाख ६१ हजार ७५०), पुणे ः १४,७४० (१७ हजार २४०), रायगड ः ७ (९०), रत्नागिरी ः ९ (२०), सांगली ः ४२,९९६ (६१ हजार ४००), सातारा ः २१,१५१ (२४ हजार ८९०), सिंधुदुर्ग ः १८ (५०), सोलापूर ः ९४,८४७ (१ लाख ४२ हजार ३१०) वर्धा ः ३५,६३५ (६७, ४४०), वाशीम ः ७७,८४१ (१ लाख २१ हजार ५२०), यवतमाळ ः ९४,५६० (१ लाख ४७ हजार ८४०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com