Crop Insurance : सांगली जिल्ह्यातील १ लाख हजार शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा

PM Crop Insurance Scheme : रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन ६१ हजार ९०८ हेक्टरवरील पिकांचे संरक्षण केले आहे.
Crop Insurance
Crop Insuranceagrowon
Published on
Updated on

Sangli News : रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन ६१ हजार ९०८ हेक्टरवरील पिकांचे संरक्षण केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायती), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे,

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात विमा घेणाऱ्यांची संख्या ४९ हजार १३६ ने वाढली असल्याची माहिती अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Crop Insurance
Crop Insurance Application : यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यासाठी दीड लाख अर्ज; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न झाल्यामुळे नुकसान होते. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट होते. यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सोलापुरात ९५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा; १ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण

सरकारने एक भरून पीक विमा योजना सुरू केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. गतवर्षीच्या रब्बी हंगामात ५२ हजार ८९५ शेतकऱ्यांनी पीक विमा घेत ३४ हजार ११२ क्षेत्रावरील पिकांना संरक्षण दिले होते. यंदाच्या हंगामात १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे.

तालुकानिहाय रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी घेतलेला पीकविमा दृष्टिक्षेप

तालुका कर्जदार बिगर

कर्जदार क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आटपाडी १०० १९८७१ १२९०४.८४

जत २८ ६२०८४ ३९१८३.६८

कडेगाव ९ १४०२ ५७४.७

कवठेमहांकाळ ४० ६६१७ ३६५७.९८

खानापूर ३० ३१२६ १४३१.६२

मिरज ६ ३६८४ २१७७.५७

पलूस ०० ४८८ ३०७.५६

शिराळा ६६ ३६० ८५.७४

तासगाव ३६ ३८४१ १६९५.६१

वाळवा ६ ५५८ १८८.१८

एकूण ३२१ १०२०३१ ६१९०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com