Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणात ५१ टक्के पाणीसाठा

Koyna Dam Water Storage : धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात ३.६६ टीएमसीने वाढ झाली असून, धरणाच्या पाणीसाठ्याने ५१ टक्के क्षमता पूर्ण केली आहे.

विकास जाधव 

Satara News : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात ३.६६ टीएमसीने वाढ झाली असून, धरणाच्या पाणीसाठ्याने ५१ टक्के क्षमता पूर्ण केली आहे.

धरणाचा एकूण पाणीसाठा ५४.४२ टीएमसी झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी पाऊस जास्त आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे. सलग दोन दिवस मुसळधार पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला झोडपून काढले आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७, नवजाला १२७ आणि महाबळेश्वरला १५८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्‍या २४ तासांत ३.६६ टीएमसी पाणी जलाशयात येऊन धरणाचा एकूण पाणीसाठा ५४.४२ टीएमसी झाला आहे. १०५.२५ टीएमसी एकूण पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणाचे पाणीसाठ्याचे अर्धशतक आणि ५१.७१ टक्के क्षमता पूर्ण केली आहे.

यावर्षी आजपर्यंत कोयनानगर येथे २३९३, नवजा २८४७ आणि महाबळेश्वरला २२५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणाचा एकूण पाणीसाठा ५४.४२ तर उपयुक्त ४९.३० टीएमसी झाला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, सातारा, पाटण, जावळी, वाई, कऱ्हाड या तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. यामुळे ओढे, नाले व नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांतही तुरळक ते मध्यम स्वरूप पाऊस सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT