Koyna Dam : कोयना धरणात २४ तासात ४ टीएमसी पाणीसाठी वाढ, ४८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी

Increase Water Koyna dam : २४ तासांत नवजाला तब्बल २७४ तर कोयनेला १८७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.
Koyna Dam
koyna damagrowon
Published on
Updated on

Koyna Dam Satara : मागच्या काही दिवसांपासून शांत झालेला पाऊस पुन्हा जोर धरू लागला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील घाट माथ्यावर होत असलेल्या जोरदार पावसाने कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. आज (दि.१५) सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला तब्बल २७४ तर कोयनेला १८७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणातही सुमारे ४८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणसाठा ४०.४३ टीएमसी झाला. तर जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, वाई, जावळी आणि सातारा तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे.

पाटण तालुक्यात शनिवारी दिवसभर संततधार पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, रात्री उशिरा पश्चिम घाटात मुसळधार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे ओढे-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. गेल्या २४ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे २२० (१९१७) मिलिमीटर, नवजाला विक्रमी २९८ (२२१०) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १५८ (१७०५) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी जलाशयात प्रतिसेकंद १३ हजार २४० क्युसेक पाण्याची आवक होत होती.

Koyna Dam
Koyna Dam : ‘कोयने’च्या पाणीसाठ्यात दोन ‘टीएमसी’ने वाढ

पश्चिम भागात आणि विशेषत: करुन कोयना धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेत सोमवारी सकाळच्या सुमारास ४८ हजार ६११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झालेला. पश्चिमेकडील या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच ओढे-नाले भरुन वाहत आहेत. पूर्व दुष्काळी तालुक्यात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

कोयना धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास धरणात ३६.२३ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर सोमवारी सकाळी पाणीसाठ्यात चार टीएमसीहून अधिक वाढ झाली. पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झाला होता. जूनपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक पाणीसाठा वाढ झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com