Video
Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?
Loan Waiver Beneficiaries:कर्जमाफीची घोषणा झाली, चार याद्या प्रसिद्ध झाल्या, पण अनेक शेतकऱ्यांच्या हातात अजूनही काहीच पडलं नाही! कुणाचं नाव यादीत नाही, कुणाचं नाव दुसऱ्याच गावाच्या यादीत, तर कुणाची ई-केवायसी होऊनही कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, पण बँका नवीन पीककर्ज द्यायला तयार नाहीत.कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज का दिलं जात नाही? आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेलं ५० हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
