Cashew Tree Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Madura Fire: मडुरा येथे आगीत काजूची ५०० झाडे जळाली

Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा येथे लागलेल्या आगीत सुमारे ५०० काजू झाडांसह आंबा आणि नारळाच्या झाडांचे लाखोंचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग विझवताना एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत ५०० हून अधिक काजूची कलमे जळाली. याशिवाय आंबा, नारळाची झाडे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविताना एक महिला गंभीर जखमी झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मडुरा बाबरवाडी येथे बुधवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. सुकलेले गवत आणि कडक ऊन यामुळे आगीचा भडका उडाला. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

परंतु तत्पूर्वीच काजू बागेपर्यंत आग पोहोचली होती. शेतकरी पुंडलिक धुरी, नेत्रा धुरी, राधाबाई नाईक यांच्या काजू बागांमध्ये आग झपाट्याने पसरत होती. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु आग आटोक्यात आणण्यापूर्वी काजुची ५०० झाडे जळाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आगीत साधारणपणे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझविताना नेत्रा नाईक या गंभीर जखमी झाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT