Unseasonal Rain Crop Damage : वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांना फटका

Hailstorm Crop Loss : डोळखांब भागात झालेली गारपीट व तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या वादळ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Mango Crop Damage
Mango Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Thane News : डोळखांब भागात झालेली गारपीट व तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या वादळ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडून भरघोस मदत मिळावी, अशी मागणी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी शहापूर तहसीलदारांकडे केली आहे.

तालुक्यात शुक्रवारी (ता. ४) दुपारी ३च्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्याचे जनजीवन विस्कळित झाले आहे. किन्हवली, शेणवा व डोळखांब परिसरात अनेक घरांची छपरे उडाली आहेत.

Mango Crop Damage
Unseasonal Rain Crop Damage : पीकहानीचे पंचनामे अनेक गावांत झालेच नाहीत

आंबा, चिकू, शेवगा बागायतदार, काकडी, भेंडी आदी रब्बी पिके, वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिवसभर ४२ अंश उच्चांकी तापमानामुळे होरपळून निघालेले जनजीवन सायंकाळी पडलेल्या पावसामुळे सुखावले.

Mango Crop Damage
Unseasonal Rain Crop Loss : अवकाळी पावसाने एकोणसाठ गावांत नुकसान

मात्र, सोसायट्याचा वारा व अवकाळी पाऊस, गारपिटीने शेणवे, किन्हवली, डोळखांब, टाकीपठार आदी परिसरात धुमाकूळ घातला. काकडी, भेंडी, घोसाळे, कारले, घेवडा आदी रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या आंब्यांचा पडलेला खच बघून शेतकरी हताश झाले आहेत.

संसार उघड्यावर

अनेक आदिवासी, शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची, गोठ्यांची छपरे उडाली आहेत. काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आली आहेत. घरातील कपडे, धान्य, गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. गुरे, ढोरे व अनेक जण जखमी झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या. त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com