Short Circuit Fire : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचं शॉट सर्किटमुळे आग लागून ९ लाख ७५ हजारांचं नुकसान

Washim District News : कुऱ्हा (ता. रिसोड) येथील शेतकरी गजानन माणिकराव नागरे (४५) यांच्या शेतातील गोठा शनिवारी (ता.१२) जळून खाक झाला. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नागरे यांनी केली आहे.
Short Circuit Fire
Short Circuit FireAgrowon
Published on
Updated on

Agriculture Fire : राज्यात वाढत्या उष्णतेसह विद्युत तारेच्या शॉट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच गोठ्याला आग लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. वाशिम जिल्ह्यात शेतातील गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. कुऱ्हा (ता. रिसोड) येथील शेतकरी गजानन माणिकराव नागरे (४५) यांच्या शेतातील गोठा शनिवारी (ता.१२) जळून खाक झाला. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नागरे यांनी केली आहे.

नागरे यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात आगीबद्दल कोणावरही काहीही संशय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नागरे म्हणाले, "जनावारांचा गोठा शेतात आहे. शनिवारी दुपारी आग लागल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या आगीत ९ लाख ७५ हजारांचं शेती उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. महसूल विभागाचे अधिकारी सोमवारी येऊन पंचनामे करणार आहेत. रीतसर आम्हाला नुकसान भरपाई मिळावी." अशी मागणी नागरे यांनी केली आहे.

Short Circuit Fire
Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

या आगीत ९ लाख ७५ हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. परंतु शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. नागरे यांनी याबाबत रिसोड येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

कुऱ्हा येथील शेतशिवारातील गट क्रमांक २२/२ मध्ये नागरे यांची शेत जमीन आहे. या शेत जमिनीवर जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात नागरे यांचे शेती उपयोगी साहित्य होते. शनिवारी दुपारी विद्युत तारांमुळे शॉट सर्किट झाले. त्यामुळे गोठ्याच्या परिसरात आग लागली. या आगीत शेतकरी गजानन नागरे यांचे तुषार सिंचनाचे चार संच आणि पाच हेक्टरमधील गोळा करून ठेवलेली ठिबकचे संच जळाले.

तसेच ट्रॅक्टरची दोन टायर आणि ट्रॉलीचे दोन टायर जळून खाक झाले. तसेच ९० एमएम पीयुसी पाईपचे १०० नग आणि शेती लाकडी साहित्य आगीत भस्मसात झाले. तर जनावरांच्या कोरड्या वैरणीचे आगीत नुकसान झाले आहे. या आगीत अंदाजे ९ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. दरम्यान, राज्यभरात शॉट सर्किटमुळे शेती पिकांना आगी लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com