Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागात उसाचे५० लाख टन गाळप

Sugarcane Season : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २९ साखर कारखाने सुरू झाले आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २९ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी सोमवारअखेर (ता. १) ५० लाख २२ हजार २८४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ४४ लाख ७२ हजार ६९५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील सर्वच २९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. सोमवारअखेर (ता. एक) या कारखान्यांनी ५० लाख २२ हजार २८४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ४४ लाख ७२ हजार ६९५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.

साखरेचा सरासरी उतारा ८.६१ टक्के नांदेड विभागात सर्वाधिक ११ साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. यात पाच खासगी तर सहा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यानंतर परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत.

हे सर्वच कारखाने खासगी आहे नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात पाच खासगी तर एक सहकारी साखर काखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी तर तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड ६ ०८,५७,०९५ ०७,५६,७१५

लातूर ११ १९,७२,२८४ १८,३८,६४५

परभणी ७ १५,६८,०८० १३,६२,३८५

हिंगोली ५ ०६,२४,८२४ ०५,१४,९५०

एकूण २९ ५०,२२,२८४ ४४,७२,६९५

विभागाचा सरासरी उतारा : ८.६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT