Sugarcane Season : सांगली जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता

Sugarcane Cultivation : यंदा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दडी मारली. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. यंदा ६२ हजार ८६० हेक्टरवर ऊसलागवड झाली असून त्यापैकी ३६ हजार ९४२ हेक्टरवर आडसाली उसाचे क्षेत्र आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Sangli News : यंदा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दडी मारली. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. यंदा ६२ हजार ८६० हेक्टरवर ऊसलागवड झाली असून त्यापैकी ३६ हजार ९४२ हेक्टरवर आडसाली उसाचे क्षेत्र आहे. कृष्णा आणि वारणा काठासह दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईच्या स्थितीमुळे दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांतही पूर्व आणि सुरू हंगामातील उसाचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांत पावसाने सरासरी गाठली. तसेच दुष्काळी पट्ट्यात परतीचा चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. त्यातच ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे वेळेत आवर्तन सुरू असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली. मात्र, यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे.

Sugarcane Season
Sugarcane Cultivation : बेणे प्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी

त्यातच पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी ऊसलागवड करण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे आडसाली हंगामात ऊस लागवड कमी झाली आहे. तर पाणी टंचाई फटका पूर्व आणि सुरू हंगामातील ऊस लागवडीला बसला आहे.

ताकारी, म्हैसाळ, आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांचे आवर्तनामुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. मात्र, यंदा दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भूजपातळी घटू लागली आहे. त्यातच कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होत आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : अपेक्षित ऊस गाळप हंगाम चालण्याची शक्यता कमीच!

त्याचा परिणाम दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि जत तालुक्याला या योजनांचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. सध्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासाठीही पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

हंगामनिहाय क्षेत्र (हेक्टर)

आडसाली ३६ हजार ९४२

पूर्व हंगाम १० हजार ८०८

सुरू हंगाम ३८५

खोडवा १४ हजार ७२४

तालुकानिहाय ऊसलागवड स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका ऊस लागवड

मिरज १६ हजार ७८२

जत २३५

खानापूर ४ हजार ३६०

वाळवा १५ हजार ८२५

तासगाव ८ हजार ३६८

शिराळा २ हजार ७८९

आटपाडी १७९

कवठेमहांकाळ २ हजार ३५१

पलूस ६ हजार ६५०

कडेगाव ५ हजार ३१८

एकूण ६२ हजार ८६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com