Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : अक्कलकोट तालुक्यातील ४९ गावे टंचाईग्रस्त

Water Scarcity : अक्कलकोट तालुक्यातील पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढतच असून, तालुक्यातील एकूण ग्रामीण भागातील १२९ गावांपैकी सध्या ४९ गावांना तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

Team Agrowon

Nagansur News : अक्कलकोट तालुक्यातील ४९ गावे टंचाईग्रस्त असून, अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव दाखल आहेत. तर चार गावांत टँकरची मागणी आहे. अक्कलकोट तालुक्यातील पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढतच असून, तालुक्यातील एकूण ग्रामीण भागातील १२९ गावांपैकी सध्या ४९ गावांना तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

सध्या तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना, पाणी टंचाईने मात्र रौद्ररूप धारण केलेले आहे. सध्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील ४९ गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी वसंतराव नाईक नगर, सुलेरजवळगे, मातनळ्ळी व जेऊर या चार गावांतून टँकरची मागणी आली आहे.

वसंतराव नाईक नगर येथे टँकर मंजूर झाला होता; परंतु अवकाळी पावसाने तारल्याने तेथे टॅंकर बंद करण्यात आला आहे. सुलेरजवळगे येथे सध्या दोन टॅंकरने प्रत्येकी दोन खेपा रोज पाणीपुरवठा चालू आहे. तर मातनळ्ळी व जेऊर या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.

तालुक्यातील गळोरगी, दोड्याळ, बोरोटी खुर्द, किणीवाडी, सातनदुधनी, सापळा, भादुले बुद्रूक, सलगर, सांगवी बुद्रूक, सांगवी खुर्द, जकापूर, बणजगोळ, हत्ती कणबस व मुगळी अशी १४ गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. तर गळोरगी, दोड्याळ, बोरोटी, किणीवाडी व सातनदुधनी या पाच गावांत आठ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. एप्रिल ते जून या महिन्यात तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

सध्या तालुक्यात ४९ गावांचे पाणीटंचाई आराखड्यांतर्गत प्रस्ताव दाखल झाले आहेत. लवकरात लवकर या गावांत शासनाकडून पाण्याचे योग्य नियोजन होईल.
व्ही. डी. राठोड, सहायक अभियंता, पाणीपुरवठा, पंचायत समिती, अक्कलकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT