Acquisition of Well : यवतमाळ जिल्ह्यात सात खासगी विहिरींचे अधिग्रहण

Well Update : यवतमाळ जिल्ह्यातील सात गावांत खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Well
WellAgrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील सात गावांत खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Well
Approval of wells : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६५ विंधन विहिरींना मंजुरी

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा प्रचंड भडकला आहे. गावातील विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे पिण्यासह वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील पुसद, वणी, राळेगाव, घाटंजी व झरी जामणी तालुक्यांतील सात गावांत निर्माण झाली. या गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

त्यात पुसद तालुक्यात तीन, वणी, राळेगाव, घाटंजी, झरी जामणी तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. सध्या एप्रिल महिना सुरू आहे. तर येत्या काही दिवसांत उष्णता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Well
Agriculture Well : ‘रोहयो’तून ७ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विहिरी

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाईच्या अनुषंगाने कृतिआराखडा बनविला आहे. त्यातून खासगी विहिरी, टँकरच्या माध्यमातून गावात पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु, मुबलक प्रमाणात पाणी मिळेल की नाही, याची कुठलीही शाश्वती नाही. त्यामुळे किमान मॉन्सून येईपर्यंत काही गावांना टंचाईच्या झळा सहन करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही.

पुसद तालुक्यात टँकर

पुसद तालुक्यातील बहुतांश गावांत दर वर्षी पाणीटंचाईची समस्या भेडसावते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेली कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांवर टंचाईला तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यातील येलदरी येथे टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com