Gopinath Munde Farmer Accident Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Insurance : अपघात विम्यापोटी ४८ कोटी मंजूर

Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून, त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Mumbai News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून, त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३७६ दावे निकाली काढले असून, त्यापोटी ४७ कोटी १२ लाख तर ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील ७७ दाव्यांपोटी १ कोटी ५१ लाख रुपयांचा विमा वितरित करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेची मुदत ७ एप्रिल २०२२ रोजी संपली होती. प्रशासकीय कारणांमुळे ही योजना लागू झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळाले नव्हते.

त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी ही योजना पुन्हा लागू करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्टमधील १३८ दिवसांच्या खंडित कालावधीत शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली होती.

त्यानंतर १७ कोटी ८३ लाख रुपये वितरित करण्यात आले होते. या खंडित कालावधीतील ७७ दावे निकाली काढणे बाकी होते. त्यातील ७३ प्रकरणे मृत्यूची, तर ४ प्रकरणे अपंगत्वाची होती.

त्या शेतकऱ्यांच्या वारसांना आता एक कोटी ५१ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे. याच टप्प्यातील २३९ दावे निकाली काढण्यात आले असून, त्यातील २३७ मृत्यू, तर २ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना ४२ कोटी ३६ लाख रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील २१३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २९३७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४३ शेतकऱ्यांना अपंगत्व आले आहे. हे दावे निकाली काढण्यासाठी ४२ कोटी ३६ लाख रुपये वारसांना वितरित करण्यात येणार आहेत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील दावे
दावे : २४५३
शेतकरी मृत्यू : २३९८
शेतकरी अपंगत्व : ४९
भरपाई रक्कम : ४८ कोटी ६३ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT