Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : परभणी जिल्ह्यातील ८३२ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी ४७.६८

Kharif Season : जिल्ह्यातील ८३२ गावांची यंदाच्या (२०२३) खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.६८ आली असल्याचे शुक्रवारी (ता. १५) जिल्हा प्रशासाने जाहीर केले.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील ८३२ गावांची यंदाच्या (२०२३) खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.६८ आली असल्याचे शुक्रवारी (ता. १५) जिल्हा प्रशासाने जाहीर केले. खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होतील, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ८३२ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ५६ हजार ९५६ हेक्टर आहे. या गावातील यंदाच्या (२०२३) खरिपातील पेरणीक्षेत्र ५ लाख १९ हजार ३१४ हेक्टर आहे तर एकूण पडीक क्षेत्र ३७ हजार ६४१ हेक्टर आहे. जिल्हा प्रशासनाने ता.३० सप्टेंबर रोजी जाहीर केलेली जिल्ह्याची हंगामी (नजरी) पैसेवारी सरासरी ५२.९२ व ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली सुधारित हंगामी पैसेवारी ४७.६८ आली होती.

शुक्रवारी (ता.१५) जाहीर करण्यात आलेली अंतिम पैसेवारी सरासरी पैसेवारी ४७.६८ आली आहे. अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व ८३२ गावांत दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होतील.

त्यात जमिनीत महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

खरीप हंगाम २०२३ अंतिम पैसेवारी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका गावांची संख्या पेरणी क्षेत्र पैसेवारी

परभणी १२८ ९६०८२ ४६.००

जिंतूर १६९ ८३८९३ ४८.९०

सेलू ९५ ६२२२६ ४८.२१

मानवत ५३ ४२२४० ४८.१३

पाथरी ५६ ३७३९२ ४६.००

सोनपेठ ५२ ३३४२९ ४८.१५

गंगाखेड १०५ ५९२०८ ४७.००

पालम ८० ४६१२९ ४८.००

पूर्णा ९४ ५८७१५ ४८.६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

SCROLL FOR NEXT