Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : बारा कारखान्यांकडून ४७ लाख ९३ हजार टनांवर ऊस गाळप

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) गाळप हंगामात सोमवार (ता. १८) अखेरपर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील सर्व १२ साखर काराखान्यांनी एकूण ४७ लाख ९३ हजार ७०२ टन ऊस गाळप केले. एकूण ४७ लाख ३४ हजार ७८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. परभणी जिल्ह्यातील ३ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ साखर कारखान्याचे गाळप हंगाम बंद झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व ७ खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ४ हजार ७२३ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.८७ टक्के उताऱ्यांने एकूण ३२ लाख ६० हजार ३८० क्विंटल साखर उत्पादन घेतले. गंगाखेड शुगर्सने सर्वाधिक ७ लाख ८४ हजार ७२६ टन ऊस गाळप केले आहे. रेणुका शुगर कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ११.१९ टक्के आला आला आहे.

देवनांदरा (ता. पाथरी) येथील रेणुका शुगर, कारखाना, माखणी येथील गंगाखेड शुगर कारखाना, आडगाव दराडे येथील तुळजाभवानी शुगर कारखाना या ३ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम बंद झाले आहे. परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सिरप, ज्यूस इथेनॉलकडे वळविल्यामुळे साखर उताऱ्यात सरासरी १.७५ टक्का घट येऊन सरासरी ९.८५ टक्के साखर उतारा आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी मिळून एकूण १४ लाख ८८ हजार ९७९ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.९ टक्के उताऱ्याने १४ लाख ७४ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. वाकोडी येथील शिऊर साखर कारखान्याने सर्वाधिक ४ लाख २३ हजार १४४ टन ऊस गाळप केले आहे.

वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०.४७ टक्के आहे. कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे गाळप १८ जानेवारी रोजी बंद झाले आहे. सर्वात कमी ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सिरप, ज्यूस इथेनॉल निर्मितीकडे वळविल्यामुळे साखर उताऱ्यात सरासरी १.५१ टक्के घट येऊन साखर सरासरी ९.४३ टक्के साखर उतारा आला.

ऊसगाळप स्थिती (टनांमध्ये) साखर

उत्पादन (क्विंटलमध्ये) सोमवार ता. १८अखेर

कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा टक्के हंगाम बंद दिनांक

रेणुका शुगर, पाथरी २२७००७ २५४३९० ११.१९ ९ मार्च

श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर, आमडापूर ४७५६८५ ४२६६०० १०.७ ---

योगेश्‍वरी शुगर, लिंबा २८९३२५ २८६०१० ९.८१ ---

गंगाखेड शुगर, माखणी ७८४७२६ ७९२५८० ९.४७ १४ मार्च

ट्वेन्टीवन शुगर, सायखेडा ७४७४३० ६५५३०० ८.८३ ---

बळीराजा शुगर, कानडखेड ५९४८०० ६८९१०० १०.४३ ----

तुळजाभवानी शुगर, आडगाव दराडे १८५७५० १५६४०० ८.३ १६ मार्च

भाऊराव चव्हाण ससाका, डोंगरकडा २५४४१० २४७५५० ९.७९ ---

पूर्णा ससाका, वसमत ३८३३९० ३९८६०० १०.४७ ---

कपिश्‍वर शुगर्स, जवळाबाजार ४०२८६० ३८१९०० ९.९५ --

टोकाई ससाका, कुरुंदा २५१७५ १८७५० ६.३४ १८ जानेवारी

शिऊर साखर, वाकोडी ४२३१४४ ४२७६०० ९.८ ---

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT