Sugarcane Crushing : राज्यात अजून ५० लाख टन उसाचे गाळप बाकी

Sugarcane Season : राज्याच्या ऊस गाळपाबाबत यापूर्वी केलेले अंदाज सपशेल चुकले आहेत. आतापर्यंत अंदाजापेक्षाही जादा म्हणजेच ९७८ लाख टन गाळला गेला आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या ऊस गाळपाबाबत यापूर्वी केलेले अंदाज सपशेल चुकले आहेत. आतापर्यंत अंदाजापेक्षाही जादा म्हणजेच ९७८ लाख टन गाळला गेला आहे. अजूनही अंदाजे ५० लाख टन उसाचे गाळप बाकी असून, अतिरिक्त उसासाठी नियोजनाच्या सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत.

आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात अतिरिक्त उसाची समस्या आढळलेली नाही. केवळ मराठवाड्यात तेदेखील जालन्याच्या दोन तालुक्यांमध्ये ३ लाख हेक्टरच्या आसपास ऊस जादा असल्याचे पत्र आले आहे. परंतु अशी पत्र गेल्या काही हंगामापासून त्याच भागातून सतत येतात.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : ‘विठ्ठल’चे १०७ दिवसांत आठ लाख टन ऊस गाळप

गेल्या हंगामातदेखील जादा ऊस असल्याचे पत्र आले आणि शेवटच्या टप्प्यात एकाही गावात ऊस शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले होते. परंतु खबरदारी म्हणून अहमदनगर व नांदेड अशा दोन्ही साखर सहसंचालकांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त उसाबाबत काटेकोर नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत २०७ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडील ९७८ लाख टन ऊस खरेदी केला आहे. या उसाच्या गाळपापासून ९९ लाख टन साखर तयार केली आहे. सध्या १०.१३ टक्के साखर उतारा येतो आहे. पाणीटंचाई व कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे साखर कारखानेदेखील झपाट्याने बंद होत आहेत. आतापर्यंत ३८ कारखाने गाळप आटोपून बंद झाले आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : नांदेड विभागात ९४ लाख टन उसाचे गाळप

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, येत्या दहा दिवसांत आणखी ५० कारखाने बंद होतील. गेल्या हंगामात याच कालावधीत २११ कारखान्यांनी १०२१ टन ऊस गाळला होता. त्यापासून १०१ लाख टन साखर तयार केल्यानंतर यातील १०९ कारखाने बंद केले गेले होते. राज्यात नेमका किती ऊस असेल व त्यापासून किती साखर तयार होईल, याविषयी शासनाने तयार केलेले अंदाज चुकले आहेत.

या कारणांमुळे चुकले उसाचे अंदाज

- पुरेसा पाऊस नसल्यामुळे गेल्या हंगामात ऊस उपलब्धता केवळ ९२४ लाख टन राहण्याचा होताचा अंदाज.

- गेल्या हंगामात साखर उत्पादनदेखील २० लाख टनांनी घटण्याचा अंदाज केला गेला.

- नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

- अवकाळी पावसामुळे उसाचे पोषण चांगले झाले व उत्पादकता वाढली.

- कोल्हापूर भागातील ऊस आंदोलनामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. परिणामी, उसाचा अंदाज आला नाही.

- गुजरातमध्ये तोडणीसाठी मजुरांना प्रतिटन ४७६ रुपये दर जाहीर झाला. त्यामुळे राज्यातील मजुरांनी गुजरातला जाणे पसंत केले.

- मजुरांअभावी अनेक कारखान्यांचा ऊस वेळेत तोडला गेला नाही. त्यामुळे नेमका किती ऊस तोडला जाणार याचा अंदाज आला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com