E Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : ई-पीक नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

ई-पीक नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Team Agrowon

Amravati News : मोबाईल पीक पाहणी अॅपद्वारे (E-Peek Pahani) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच यापुढे नुकसानभरपाई (Compensation) दिली जाणार आहे. त्याकरिता १५ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली असून अद्याप ४५ टक्के खातेदारांनी मोबाईल ॲपचा वापर करीत नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीक पेरा नोंदणीसाठी (Crop sowing registration) शासनाने ई-पीक पाहणी ॲपचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याकरिता शासनस्तरावरून प्रोत्साहन पण दिले जात आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा लाभ यापुढे त्यांनी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंद केल्यानंतरच दिल्या जाणार आहे.

अशी नोंद झालेली पिके मदतीसाठी ग्राह्य धरली जातील. त्यामुळे पीक पेऱ्याची नोंद न केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरावर यासाठी अभियान राबविण्यात येत आहे.

यासाठी वर्जन-टू हे ॲप विकसित करण्यात आले आहे. याद्वारेच केलेली पीक करायची नोंद स्वयंप्रमाणित मानण्यात येणार आहे. यंदाचा खरीप हंगाम सततच्या पावसाने लांबल्याने रब्बी हंगाम देखील लांबणीवर पडला.

त्यामुळे ई-पीक नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत पीक पेऱ्याची नोंद करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांनी केले आहे.

सद्यःस्थितीतत ६०९०० शेतकरी खातेदारांनी त्यांच्या एक लाख ३८९३ हेक्टरवरील पिकांची नोंद केली आहे. त्यानंतर देखील ४५ टक्के खातेदार शिल्लक असल्याने ते मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीक ॲपवर नोंदणी करावी असे आवाहन रणजित भोसले यांनी केले.

अशी आहे तालुकानिहाय नोंदणी

अचलपूर तालुक्यात ३८६५, अमरावती ५६३९, अंजनगाव ४२५४, चांदूरबाजार ४७३९, चांदूर रेल्वे ५५६७, चिखलदरा ४०१, तिवसा ४८५३, दर्यापूर ५२३१, धामणगाव ८१७२, धारणी १०४९, नांदगाव खंडेश्वर ५८८९, भातकुली ४४४७, मोर्शी ५४५४, वरुड १३४० व वरुड तालुक्यात १३४० खातेदारांनी ॲपवर नोंदणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT