Chhatrapati Sambhajinagar News: जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ चा सुमारे ६,४७७ कोटींचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. १७) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळ बैठकीत ठेवण्यात आला. तो कॅबिनेटमध्ये पाठविण्याकरिता जलसंपदा मंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामुळे या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. येत्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे महासंचालक संतोष तिरमनवार यांनी दिली..गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची ८८ वी बैठक शुक्रवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाील पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी टप्पा-२ प्रकल्पामध्ये पैठण उजवा कालवा ० ते १३२ पूर्ण झाला आहे. त्यानंतर माजलगाव धरण आणि माजलगाव कालवा १ ते १४८ किलोमीटर आहे..Jaykwadi Dam: जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या पिकात साचलं पाणी.माजलगाव धरण पूर्ण आहे. त्यानंतर १ ते १०१ किलोमीटर माजलगाव कालवा पूर्ण आहे. १०१ ते १३५ किलोमीटर दरम्यानची कामे सुरू आहेत. याशिवाय पाच मार्गस्थ जलाशय आहेत. यापैकी दोन जलाशयांचे काम सुरू आहे. तर गंगाखेड, लोहा, पालम या तालुक्यांतील तीन जलाशयांचे काम सध्या बंद असल्याची स्थिती आहे..माजलगावसाठी स्वतंत्र योजनामाजलगाव तालुक्यासाठी ‘साळींबा’ या स्वतंत्र उपसा योजनेस शासनाने मान्यता दिली. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास ही योजनासुद्धा सुरू करता येईल. या योजनेवर साधारणतः ४०० ते ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. उर्वरित कालव्याची कामे झाल्यास साधारणतः ६० हजार हेक्टर सिंचनाला त्याचा लाभ होईल, असे श्री. तिरमनवार यांनी सांगितले..लोकसेवेसाठी स्टेडियम, पाण्याची टाकी, स्मशान भूमी, काही कार्यालय उभारणीसाठी जागा देण्याचा विषय होता. तो नियामक मंडळाने मान्य केला. त्यामध्ये सिल्लोड, सोनपेठ, नाशिक, अहिल्यानगर, राहता, येथीलदेखील जागांचा समावेश आहे. महामंडळ स्वायत्त होण्यासाठी महामंडळाकडील उपलब्ध जागा योग्य वापरासाठी सल्लागार नेमला आहे. त्याच्याकडून तीन महिन्यांत अहवाल येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले..Jayakwadi Dam : जायकवाडीच्या विसर्गात घट वाढ सुरूच .जेवढा खर्च, तेवढेच उत्पन्नएक महामंडळ, तीन मुख्य अभियंता कार्यालय, १० मंडळे, जवळपास ६० विभाग अशा महामंडळावर वेतनापोटी साधारणतः वर्षाकाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च होतो. महामंडळाचे तीनशे-साडेतीनशे कोटी रुपये उत्पन्न आहे. परंतु देखभाल दुरुस्तीसाठी निधी उरत नाही. त्यामुळे शासन वेतनाचा भार उचलते. उत्पन्नातून देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविण्याचा प्रयत्न होतो, परंतु तो निधी अत्यंत तुटपुंजा आहे. वर्षाकाठी एक हजार कोटी देखभाल दुरुस्तीसाठीच लागतात, अशी स्थिती आहे..डावा कालवा दुरुस्तीला मान्यतेची प्रतीक्षाएप्रिल महिन्यात डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८०० कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तो शासनाच्या अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याला मान्यता मिळाल्यास जायकवाडीच्या उजव्या कालव्याप्रमाणेच डाव्या कालव्याचे काम करून त्याचीही क्षमता वाढविण्यास मदत होईल, अशी माहिती श्री. तिरमनवार यांनी दिली..तत्काळ हवे २५० कोटी रुपयेभूसंपादनासाठी मार्च २६ अखेर किमान ३०० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. शिवाय तत्काळ २५० कोटी रुपये देण्याची मागणी स्वतंत्र पत्राने मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने केली आहे. ही मदत मिळाल्यास अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास मदत होईल, मात्र तो विषयही प्रलंबित असल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.