Kolhapur News: येणाऱ्या इथेनॉल आर्थिक वर्षात (२०२५-२६) तेल उत्पादक कंपन्यांनी १०७९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी नोंदवली आहे. या मध्ये धान्यआधारित डिस्टिलरींकडून सुमारे ७६० कोटी लिटरची मागणी करण्यात आली आहे. .मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के इतका आहे. साखर उद्योगात सध्या ऊस-आधारित इथेनॉल उत्पादनात घट होत आहे. यामुळे सरकार मका आणि धान्यांना इथेनॉल निर्मतीचा पर्याय म्हणून पुढे आणत आहे..Ethanol Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवा, साखर उद्योगाची मागणी.मागणी केलेल्या १०७९ कोटी लिटर पैकी मक्यापासून बनविलेल्या ४७८ कोटी लिटर इथेनॉलला कंपन्यांनी पसंती दिली आहे. हा आकडा गेल्या वर्षांच्या तुलनेत मोठा आहे. २०२४-२५ मध्ये मक्याचा वाटा २५ ते ३० टक्के इतका होता. यंदा त्यात ४५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे..मक्यानंतर मागणी केलेल्या इथेनॉलमध्ये एफसीआय तांदळाचा वाटा २२.२५ टक्के (सुमारे २३३.३ कोटी लिटर) आहे. उसाचा रस १५.८२ टक्के (१६५.९ कोटी लिटर), बी-हेवी मोलॅसिस १०.५४ टक्के (११०.५ कोटी लिटर), खराब धान्ये ४.५४ टक्के (४७.६ कोटी लिटर) आणि सी-हॅवी मोलॅसिस १.१६ टक्के (१२.२ कोटी लिटर) असा मागणीचा प्राधान्य क्रम आहे..सध्या सुरू असलेल्या (२०२४–२५) पुरवठा वर्षात, नोव्हेंबर ते सप्टेंबर या कालावधीत तेल उत्पादक कंपन्यांना ९०४.८४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. एकूण करार केलेली मात्रा ११३१.७० कोटी लिटर इतकी आहे. त्यापैकी ५९८.१४ कोटी लिटर इथेनॉल धान्याधारित स्रोतांमधून, तर ३०६.७० कोटी लिटर उसावर आधारित स्रोतांमधून मिळाले आहे..Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा.मागणी इथेनॉल निर्मिती क्षमतेच्या निम्मीचयेणाऱ्या वर्षासाठी साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलपैकी केवळ २८९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी नोंदवण्यात आली आहे. यामुळे साखर उद्योगतून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. हे वाटप अपेक्षेपेक्षा खूपच कमी असून साखर क्षेत्राच्या क्षमतेच्या तुलनेत अन्यायकारक आहे..साखर उद्योगापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची क्षमता ५०० कोटी लिटर इतकी आहे. म्हणजे सुमारे ५० लाख टन साखर इथेनॉलडे वळवता येऊ शकते. या तुलनेत नोंदवण्यात आलेली मागणी निम्म्यानेच आहे. अपेक्षेइतकी इथेनॉलनिर्मिती आणि विक्री न झाल्यास साखर उद्योग अडचणीत येऊ शकतो, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.