E-Pik : नळेगावात तलाठ्याकडून ई-पीक पाहणी

पिकांची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ई- पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे करावी.
E-Peak
E-PeakAgrowon
Published on
Updated on

नळेगाव ः ई-पीक पाहणी (E-Pik) करण्यासाठी चाकूर तालुक्यातील नळेगाव सज्जाचे तलाठी शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर गेले आहेत. पिकांची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ई- पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे (Mobile App) करावी.

ई-पीक पाहणी न केल्यास हरभरा (Chana), ज्वारी (Jwari), गहू (Wheat) इत्यादी पिकांची नोंद ७/१२ येणार नसल्याने आपणास नाफेडमध्ये विक्री करता येणार नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती, गारपीटचे अनुदान येणार नाही आणि आपला ७/१२ चा पीक पेरा चालू पड म्हणून अपोआप नोंद होईल.

E-Peak
E - pik Pahani : रब्बीची ५० हजार हेक्टरची ई-पीक नोंदणी

तरी आपण आपला पिक पेरा ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप नोंद करावी, असे आवाहन काही दिवसांपासून चाकुरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे करत आहेत.

शेतकरी मात्र याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे नळेगाव सज्जाचे तलाठी प्रशांत तेरकर, कोतवाल सदानंद क्षीरसागर आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शेतात जाऊन ई-पीक पाहणी करून देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com