Pune News: भोरची बाजारपेठ लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या झेंडूच्या फुलांनी सजली. शहरातील चौपाटी परिसरात सोमवारी (ता. २०) सकाळपासूनच फुले विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली. चौकटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तीन बाजूंच्या रस्त्यांवर शेतकरी आणि व्यावसायिकांनी फुले विक्रीस सुरुवात केली..फुलांचे ढीग लावून १०० पेक्षा अधिक विक्रेत्यांनी विक्री सुरू केली. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ही शेतातील झेंडूची फुले विक्रीसाठी आणली. बाजारपेठेत फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली तरीही झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कमी झाले नाहीत. लाल आणि पिवळ्या झेंडूंचा भाव हा प्रतिकिलोसाठी ७० रुपयांपासून सुरू झाला. झेंडूची ताजे फुले सुमारे १०० रुपये प्रतिकिलोने विकली गेली..Flower Farmers Issue: फूल उत्पादकांचे चेहरे कोमेजले.शहरातील चौपाटी परिसरात सर्वाधिक फुले विक्रेते बसले होते. याशिवाय शिवाजी पुतळा रोड, नगरपालिका चौक,मंगळवार पेठ आणि एसटी स्टँड जवळ स्थानिक शेतकरी व व्यावसायिक यांनी फुलांच्या विक्रीची दुकाने थाटली. झेंडूच्या फुलांबरोबर लहान मुलांनी बनवलेल्या किल्ल्यांवर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मातीची चित्रे ही विक्रीसाठी ठेवण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, घोडे, विविध प्रकारची झाडे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे..Flower Rate: झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव.जुन्नरमध्ये दराबाबत नाराजीदसऱ्याच्या सणाला फुलांच्या बाजारात तेजी होती, मात्र ऐन दिवाळीच्या सणासुदीला फुलांचे बाजारभाव समाधानकारक नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. फुलांची विक्री केल्यानंतर भांडवली खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याने फूल उत्पादकांची दिवाळी कशी साजरी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जुन्नर तालुक्यातील कुसूर, वडज, निमदरी, सावरगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेतले जाते. झेंडू, शेवंती या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांकडून या फुलांचे उत्पादन घेतले जाते..येथील फूले मुंबई येथील दादरसह अन्य मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. सध्या शेवंती फुलाला प्रती किलोस चाळीस ते शंभर रुपये तर झेंडू फुलाला चाळीस ते ऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याचे फुल उत्पादक शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले. शेवंती फुलांसाठी एकरी भांडवली खर्च दीड लाखाहून अधिक खर्च येतो..तर झेंडू साठी सत्तर हजारपर्यंत भांडवली खर्च येत आहे. शेवंतीची फुले चार महिन्यानंतर तर झेंडू दोन महिन्यानंतर काढणीस येतो. सध्याच्या बाजारभावामुळे भांडवली खर्च देखील सुटणार नसल्याने फुल उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीत आर्थिक संकटात सापडला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.