Well Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Well Subsidy : मनरेगा सिंचन विहिरींचे ४५ कोटी अनुदान थकित

MGNREGA Irrigation Well : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सिंचन विहीर योजना सुरू आहे. या मनरेगा सिंचन विहिरींचे ४५ कोटी अनुदान थकले असून जिल्ह्यात ९२ विहिरींची कामे पूर्ण आहेत

Team Agrowon

Kolhapur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सिंचन विहीर योजना सुरू आहे. या मनरेगा सिंचन विहिरींचे ४५ कोटी अनुदान थकले असून जिल्ह्यात ९२ विहिरींची कामे पूर्ण आहेत, तर ८९५ विहिरींची कामे अपूर्ण आहेत.

परिणामी उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात शेतीसाठी सिंचनाचा टक्का वाढणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या विहिरींची कामे पूर्ण झाल्यास सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र विहिरीच्या सिंचनाखाली येईल असे चित्र आहे.

गेल्या वर्षापासून नवीन सिंचन विहीर करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एक लाख रुपयांनी वाढ केली आहे. आता पाच लाख रुपये अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचन करता यावे, यासाठी तसेच मजुरांना रोजगार मिळावा म्हणून ‘मगांराग्रारोहयो’तून सिंचन विहिरीचे काम करण्यासाठी अनुदानाचा लाभ दिला जातो.

पाच एकर क्षेत्राच्या आतील अल्पभूधारक शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतात. या योजनेच्या कामावरील मजुरांच्या मजुरीत वाढ केली. याशिवाय विहीर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने विहिरीच्या अनुदानातही चार लाख रुपयांवरून पाच लाख रुपये इतके अनुदान केले आहे.

जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ९८७ विहिरी मंजूर आहेत. तर पाच लाखांच्या अनुदान मिळणाऱ्या नव्या विहिरींचे ११७८ मंजूर असलेले लाभार्थी आहेत. एप्रिलपासून ९२ विहिरी बांधून पूर्ण झाले आहेत. दरम्यान, सिंचन विहिरीचे ४५ कोटी अनुदान थकीत असल्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. परिणामी ८९५ विहिरींची कामे अपूर्ण राहिली आहेत.

शेतकऱ्यांनी सिंचन विहीर या वैयक्तिक योजनेचा लाभ घ्यावा. ग्रामसभेत मंजुरी घेऊन तालुक्याला प्रस्ताव पाठवावा. विहिरी पूर्ण झाल्यानंतर पाणी साचून उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा उपयोग होईल.
- अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT