Akola News : गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १८ तालुक्यांतील ८२३ गावांना फटका बसला आहे. ४४ हजार ५७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे. पंचनाम्यानंतर नुकसानभरपाई निश्चित होणार आहे.
सोमवारी आणि मंगळवारी (ता. २६, २७) अमरावती विभागास अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. या पावसाने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल वाशीम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यास झळ पोहोचली आहे. अमरावती जिल्ह्यातील २२७८ हेक्टर, वाशीममधील ३०१४ हेक्टर व यवतमाळमधील ४५० हेक्टरमधील गहू, ज्वारी, संत्रा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तालयाने मंत्रालयात पाठवला आहे. विभागात तीन मोठ्या व चार लहान जनावरांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, भुईमूग, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यात मागील दोन दिवसांत पावसाने धुळधाण केली आहे. रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी (ता.२६) व मंगळवारी (ता.२७) पाऊस, गारपीट झाली. सोमवारच्या पावसाने सुमारे ३७९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जामोद, सुनगावमध्ये संत्रा बागांसह कांद्याचेही नुकसान झाले. मका, गहू, रब्बी ज्वारीचे पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले.
विभागातील नुकसानीची स्थिती
जिल्हा बाधित तालुके गावे बाधित हेक्टर क्षेत्र
अमरावती २ १४५ २२७८
अकोला ४ ३६१ १७०६९
यवतमाळ १ ३२ ४५०
बुलडाणा ८ २५९ २१,७६८
वाशीम ३ २६ ३०१४
सलग तीन वर्षांपासून जळगाव तालुक्यातील जामोद, सुनगाव परिसरातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने कोलमडला आहे. सरकारने मदत न देता संपूर्ण कर्ज मुक्ती देऊन या भागातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.समाधान दामधर, शेतकरी, जामोद, जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.