Drought News Maharashtra : यंदा अल् निनोमुळे भारतातील अनेक राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक राज्यांची दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मागच्या महिन्यात कर्नाटकमधील १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळा जाहीर करण्यात आला. याबाबत केंद्रिय समितीने तालुक्यांची पाहणी करून यावर अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
पण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असताना अद्यापही यावर कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील ४३ तालुक्यांत ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. यामध्ये ४३ तालुक्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
https://whatsapp.com/channel/0029Va6bBAMI1rckFSh9s61r
राज्यात मागच्या ४ महिन्यात सरासरीच्या ४० टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याने खरिप हंगाम बऱ्यापैकी मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात अत्यंत वाईट परिस्थिती असलेल्या राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा 'ट्रिगर-टू' लागू करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे.
पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणीपातळीत घट, पिकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, संपूर्ण पिके वाया जाणे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताची सद्य:स्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू' लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, खरीप २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महा-मदत' प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर-टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूर यांच्यावतीने तयार केलेल्या 'महा-मदत' अॅपचा वापर करावा लागणार आहे.
त्यानुसार दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे, याचा अहवाल तयार होईल. त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर होणार आहे. ही प्रक्रिया अद्याप सुरू होत असून त्याचा अहवाल ऑक्टोबरअखेरीस शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जिरायतदार शेतकऱ्यांना ८ हजार ५०० तर बागायतदार शेतकऱ्यांना १७ हजार, बहुवार्षिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना २२ हजार ५०० रुपये मदत मिळू शकते.
४३ तालुके चिंताजनक कंसात जिल्हे
उल्हासनगर (जि. ठाणे), शिंदखेडा (धुळे), नंदुरबार (नंदुरबार), मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे (पुणे), बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा (जालना), कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई (सातारा), हातकणंगले व गडहिंग्लज (कोल्हापूर), औरंगाबाद व सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), अंबाजोगाई, धारूर व वडवणी (बीड), रेणापूर (लातूर), लोहारा, धाराशिव व वाशी (धाराशिव), बुलडाणा व लोणार (बुलडाणा).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.