Crop Loan
Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Update : नाशिक जिल्ह्यासाठी पीककर्जाचा ४२०० कोटींचा लक्ष्यांक जाहीर

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यासाठी २०२२-२३ वर्षासाठी पीक कर्जवाटप लक्ष्यांक ४ हजार १६ कोटी रुपये होता. मात्र ३१ मार्च २०२३ अखेर ३ हजार ४२६ कोटींचे पीक कर्जवाटप (Distribution of crop loans)जिल्ह्यात झाले. यात सरकारी बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांचा सहभाग आहे.

एकूण पीक कर्ज लक्ष्यांकाच्या ८५.३२ टक्के उद्दीष्ट साध्य झाले आहे. तर २०२३-२४ वर्षासाठी ४ हजार २०० कोटी रुपये निर्धारित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेश पाटील यांनी दिली.

मागील वर्षी पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक लक्ष्यांक सरकारी बँकांना देण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून तो पूर्ण झालेला नाही. मात्र चालूवर्षी त्यात वाढ करण्यात आली आहे. त्या खालोखाल खासगी बँकांना हा लक्षांक देण्यात आला. त्यांनी ११३ टक्के वितरण पूर्ण केले आहे.

तर ग्रामीण बँकांचा आकडा अवघा ११ कोटी असला तरीही त्यांनी तो पूर्ण करून सर्वाधिक टक्केवारी १५५ इतकी ठेवली आहे. तर जिल्हा बँकेने सर्वांत कमी वितरण केले आहे. तर चालूवर्षी लक्षांक कमी करण्यात आला आहे.

पीककर्ज वितरणाची स्थिती :

वित्तीय संस्था- लक्ष्यांक- साध्य - टक्केवारी - २०२३-२४ मधील लक्ष्यांक (कोटी)

सरकारी बँका - २७०९.६ - २१९८.७- ८१.१५ - २७६४.८

खासगी बँका- ६५७.७ - ७४६.२ - ११३.४५- ८०२.५

ग्रामीण बँक - ११.३७ - १७.७०- १५५.६७- १८

जिल्हा मध्यवर्ती बँक - ६३७.३ - ४६४- ७२.८० - ६१५

एकूण- ४०१६- ३४२६.६ - ८५.३२ - ४२००

खरीप हंगामासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी बँकेकडे एप्रिल महिन्यातच त्वरित पीककर्ज मागणी अर्ज करावा, जेणेकरून आपल्याला खरीप पूर्वमशागतीसाठी आणि पेरणीसाठी बँकाकडून वेळेत कर्जपुरवठा करणे शक्य होईल.
राजेश पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT