Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणातून ४२ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Koyna Dam Discharge : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने पाण्याच्या विसर्ग वाढविण्यात आला. मंगळवारी (ता. ३०) दुपारी १२ वाजता सांडव्यावरून ४० हजार व पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक, असा एकूण ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने पाण्याच्या विसर्ग वाढविण्यात आला. मंगळवारी (ता. ३०) दुपारी १२ वाजता सांडव्यावरून ४० हजार व पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक, असा एकूण ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणात पावसाचा जोर काहीसा कमी असलातरी पावसाची आवक होत आहे. यामुळे कोयना, कण्हेर, तारळी धरणांतून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील कोयना १०७, नवजा ९९, महाबळेश्वर १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ३५,४०१ क्युसेक आवक होत आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाकडून विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी दुपारी १२ वाजता सांडव्यावरून ४० हजार व पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा एकूण ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात मंगळवारी सकाळी आठपर्यंत ८५.३७ टीएमसी (८१.११ टक्के) पाणीसाठा झाला आहे. कण्हेर व तारळी धरणातून विसर्ग कमी केला आहे. कण्हेर धरणातून ४६११, तारळी ३५२६, धोम-बलकवडी ८०० व उरमोडी ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धोम मंगळवारी सायंकाळी चार वाजता ५००० क्युसेक विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. तसेच उरमोडी धरणातूनही चार वाजता ४००० विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा व उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT