Land Record  Agrowon
ॲग्रो विशेष

Digital Land Records : स्वामित्व योजनेतून ४ हजार नागरिकांना डिजिटल उतारे

Land Records :केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील २४६ जिल्ह्यांतील ५८ लाख लाभार्थींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच आभासी पद्धतीने डिजिटल उतारे वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील २४६ जिल्ह्यांतील ५८ लाख लाभार्थींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच आभासी पद्धतीने डिजिटल उतारे वाटप करण्यात आले. त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील ३९ गावांमधील ४ हजार ८५९ नागरिकांनाही या डिजिटल उताऱ्यांचे वाटप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा भूमिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी स्वामित्व योजनेबाबतचे व ग्रामीण विकासाबाबतचे महत्त्व सर्वांना पटवून सांगितले. या अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानुसार केद्र शासन, भूमि अभिलेख विभाग व ग्रामविकास यंत्रणांमार्फत लोकांना स्वांतत्र्यपूर्व काळापासून अद्याप न झालेले त्यांच्या घरांचे अभिलेख तयार करून त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रत्येक गावठाणामधील घरांचा नकाशा व सनद अत्याधुनिक ड्रोन सर्व्हेद्वारे तयार करण्यात आली आहे.

या तयार झालेल्या अभिलेखामुळे गावामधील लोकांनादेखील गृहकर्ज मिळण्यास मदत होणार आहे. त्या मिळणाऱ्या कर्जामुळे लघू उद्योगधंदे यांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी
सांगितले.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्री. घोडके यांनी स्वामित्व योजनेचे व या उताऱ्यांचे महत्त्व विषद केले. त्यासंदर्भातील चित्रफितही या वेळी सादर केली. प्रास्ताविक श्री. घोडके यांनी केले. तर आभार गजानन पोळ यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT