Nagpur Seed Seizure: कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्याविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५१.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धमान नगर येथील ऑकट्राय फ्री झोनमधील गोडाउन क्रमांक २२/२ येथे ही कारवाई करण्यात आली..मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संतोष राय यांच्या मालकीच्या गोडाउनमध्ये अशोक लेलँड कंपनीच्या एमएच-४० एके-३९९३ या ट्रकमधून ‘सुकून’ नावाने संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्याच्या ५८ प्लॅस्टिक बॅग उतरविण्याचे काम सुरू होते. या वेळी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने आणि लकडगंज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संबंधितांना रंगेहाथ पकडले..Illegal HTBT Cotton Seeds: सोळा लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त.कारवाईदरम्यान ‘सुकून सीड्स प्रा. लि., अहमदाबाद’ या कंपनीचे ‘सुकून १५ बीजी-II’ लॉट क्रमांक ६०३० (१९९१) या विवरणाचे एकूण २,९०७ पाकिटे जप्त करण्यात आली. प्रत्येकी ४७५ ग्रॅम वजनाच्या या बियाण्याचे एकूण वजन १३.८० क्विंटल असून, त्याची किंमत २६ लाख १९ हजार २०७ रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय अनधिकृत बियाणे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला..ट्रकची अंदाजित किंमत २५ लाख रुपये असून, एकूण ५१.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती.कारवाईत तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार, प्रभारी कृषी विकास अधिकारी तथा भरारी पथक प्रमुख समाधान धुळधुळे, नागपूर तालुक्याच्या गुण नियंत्रण निरीक्षक रिना डोंगरे, कामठी तालुक्याचे गुण नियंत्रण निरीक्षक सुभाष कनिरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर तसेच लकडगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते..दरम्यान, बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘सुकून सीड्स प्रा. लि., अहमदाबाद’ तसेच विक्रमभाई चौधरी ऊर्फ विक्रम जाट (अमरावती) यांच्याविरोधात लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.