ॲग्रो विशेष

Crop Insurance: कृषिमंत्री चौहानांनी केली ३ हजार ९०० कोटी रूपयांची विमा भरपाई वितरीत

DBT Transfer: पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३ हजार ९०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता आज (ता.११) वितरीत करण्यात आला. देशभरातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे.

Sainath Jadhav

थोडक्यात माहिती...

१) ₹3,900 कोटींचा पहिला हप्ता पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

२) रब्बी हंगाम 2024-25 मधील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली.

३) दुसरा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची केंद्र सरकारची घोषणा.

PMFBY: पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३ हजार ९०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता आज (ता.११) वितरीत करण्यात आला. देशभरातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील झुंझनु येथील कार्यक्रमात बटन दाबून रक्कम हस्तांतरित केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळाला आहे. लवकरच दुसऱ्या हप्त्याची सुमारे ७ हजार ५०० ]कोटी रुपयांची रक्कमही लवकरच वितरीत करण्यात येणार, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली आहे. 

कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "एका गावातील शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी देखील सरकार त्या संबंधित शेतकऱ्याला भरपाई देईल. हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे." अशी ग्वाही त्यांनी दिली.

पिक विमा योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना?

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या रब्बी हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरला. तसेच ज्या पिकाचे नुकसान झाले होते, त्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाईची पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. ही रक्कम ३ हजार ९०० कोटी रुपये असून, ३५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम देखील लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का? खालील पद्धतीने तपासा!

शेतकऱ्यांना बँक खात्यात पिक विमा योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांनी...

१) पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी. 

२) तिथे ‘फार्मर कॉर्नर’ विभागात जाऊन आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे. 

३) त्यानंतर ‘क्लेम स्टेटस’ पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यानंतर दाव्याची स्थिती पाहता येईल.

पंतप्रधान पिक विमा योजना ही जगातील सर्वात मोठी पिक विमा योजना बनली आहे, असा दावा केंद्र सरकार करते. दरवर्षी सुमारे ४ कोटी शेतकरी या योजनेत नोंदणी करतात, आणि आतापर्यंत २३ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झाले आहेत.

ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करते. आज योजनेतील थकीत भरपाईची ३ हजार ९०० कोटी रुपये रक्कम केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न...

१) या वेळी पिक विमा योजनेचा लाभ कोणाला मिळाला?
2024-25 रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त आणि विमा काढलेल्या शेतकऱ्यांना.

२) पहिल्या हप्त्याची रक्कम किती आहे?
एकूण ₹3,900 कोटी, ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा.

३) क्लेम स्टेटस कसे तपासायचे?
PMFBY पोर्टलवर ‘फार्मर कॉर्नर’ मध्ये मोबाईल नंबरने लॉगिन करून ‘क्लेम स्टेटस’ पर्याय वापरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं

Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस

Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही

Loan Waiver Eligible List: नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या ९६ हजार पात्र यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT