Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ११ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित

Heavy Rain : ॲग्रोवन वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील धाराशिव वगळता सातही जिल्ह्यांत ३४८७ गावांतील १४ लाख ६२ हजार ८७० शेतकऱ्यांच्या जवळपास ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Crop Damage : ॲग्रोवन वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील धाराशिव वगळता सातही जिल्ह्यांत ३४८७ गावांतील १४ लाख ६२ हजार ८७० शेतकऱ्यांच्या जवळपास ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. या प्राथमिक अंदाजमध्येजवळपास ११ लाख ३१ हजार ३२१ हेक्टरवरील जिरायत, १६ हजार २२५ हेक्टरवरील बागायत तर १९ हजार ७२४ हेक्टरवरील फळ पिकाच्या नुकसानीचा समावेश आहे. मराठवाड्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार ते अतिजोरदार झालेल्या पावसाची मराठवाड्यातील २८४ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली होती. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान होणार हे जवळपास स्पष्टच होते.

प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३२ गावांतील ६४६९१ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ७२ हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील ३८७ गावांतील एक लाख ९५ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या १,५६,१४३ हेक्टरवरील जिरायत ७७ हेक्‍टरवरील बागायत तर १९ हजार २४२ हेक्टरवरील फळ पीक मिळून एक लाख हजार ३६२ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील ७५८ गावांतील ४ लाख २८ हजार २२३ शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार ६७८ हेक्टरवरील जिरायत तर २१४ हेक्टरवरील फळपीक मिळून २ लाख ८७ हजार ८९२ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

Heavy Rain
Crop Damage : नाशिकमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

हिंगोली जिल्ह्यातील ६८४ गावातील २ लाख ७६ हजार ११८ शेतकऱ्यांच्या २ लाख ४५ हजार ४८७ हेक्टरवरील जिरायत १३,३५१ हेक्टरवरील बागायत तर ६० हेक्टरवरील फळपीक मिळून २ लाख ५८ हजार ८९८ हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील ११७७ गावांतील ४ लाख ४१ हजार ३४४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ३२ हजार ८८० हेक्टरवरील जिरायत, १८९७ हेक्टरवरील बागायत तर २०८ हेक्टरवरील फळपीक मिळून ३ लाख ३४ हजार ९८५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील १७८ गावांतील ४८ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या ५८,२९२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील १७१ गावांतील ८३० शेतकऱ्यांच्या ५७६८ हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेती पिकांचे मोठे नुकसान आहे. पीकविमा कुठलीही तक्रार दाखल न करता तत्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना द्यावा. अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करावेत. घराची पडझड, इतर मालमत्तेचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. विहिरी ढासळल्या आहेत, याचेही पंचनामे करण्यात यावेत. - सुनील कोरडे, उपसरपंच, भायगव्हाण (ता. घनसावंगी, जि. जालना)

८८३ गावे बाधित नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यातील ८८३ गावे बाधित झाली आहेत. त्यामध् छये त्रपती संभाजीनगरमधील १९, जालनामधील १५५, परभणीतील ७७, हिंगोलीतील ५४९, नांदेडमध् २८, ब ये ीडमधील १४, लातूरमधील २० तर धाराशिवमधील २१ गावांचा समावेश आहे. दहा जणांचे गेले प्राण सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीत दहा जणांना आपला जीव गमावा लागला आहे. त्यामध् छये त्रपती संभाजीनगरमधील ५, जालना, बीड, लातूरमधील प्रत्की १ व ये हिंगोलीतील २ जणांचा समावेश आहे. याशिवाय एक व्यक्ती या नैसर्गिक आपत्तीत जखमीही झाला आहे. ५२३ जनावरांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीत जवळपास ५२३ दुधाळ व ओढकाम करणाऱ्या लहान, मोठ्या जनावरांचा मृत् झाला आहे. यू त्यामध्येदुभत्या लहान ३४६ व मोठ्या ११४ तर ओढकाम करणाऱ्या लहान २४ व मोठ्या ३९ जनावरांचा समावेश आहे.घरांची पडझड, गोठ्यांचेही नुकसान मराठवाड्यातील १०३ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाला असून ११९ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. याशिवाय चार झोपड्या नष्ट झाल्या आहेत. तर ८६ गोठ्यांचे या नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com