Grampanchyat  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune News : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ३७६ कोटींची वसुली

Grampanchyat Pune : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सरत्या आर्थिक वर्षअखेरपर्यंत (२०२३-२४) सुमारे ३७६ कोटी २० लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे.

Team Agrowon

Pune : पुणे ः जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सरत्या आर्थिक वर्षअखेरपर्यंत (२०२३-२४) सुमारे ३७६ कोटी २० लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. यामध्ये ३२६ कोटी ४१ लाख रुपयांची वसुली ही घरपट्टीची तर, ४९ कोटी ७९ लाख रुपयांची वसुली ही पाणीपट्टीची आहे.  

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कर वसुलीचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने घेण्यात आला. या आढाव्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. यानुसार दरवर्षी मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. ग्रामपंचायतींनी केलेली घरपट्टी वसुलीची टक्केवारी ही एकूण उद्दिष्टाच्या ८१.९७ टक्के झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली तीन टक्क्यांनी कमी आहे. पाणीपट्टीच्या उत्पन्नात मात्र कसलीही वाढ किंवा घट झालेली नसून,  गेल्या वर्षीइतकी कायम आहे.

हवेलीतील कर उत्पन्नात घट
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील हवेली तालुक्यातील गावांचा पुणे महापालिकेत समावेश झालेला आहे. यामुळे हवेली तालुक्यातील घरपट्टीच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली आहे. हवेली हा पुणे शहरालगतचा तालुका असूनही या तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून केवळ ३६ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Management: दुष्काळावर रोजगाराच्या हमीचा उतारा

Integrated Land Management System: जमीन अभिलेख प्रक्रियांसाठी एकात्मिक भूमी व्यवस्थापन प्रणाली

Namo Farmer Payment Issue: चंद्रपुरात ‘नमो’च्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत २.४५ लाख शेतकरी

Maharashtra Government Departments: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे तीन स्वतंत्र विभाग

Sugarcane Weighing Scale Inspection: ऊस वजनकाट्यांच्या तपासणीसाठी पथके

SCROLL FOR NEXT