Pune APMC News : पुणे बाजार समितीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले

Pune APMC Theft News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर बाजार आवारातील प्रशासनाचा वचक कमी होण्यास सुरूवात झाली आहे.
Pune APMC | APMC Election
Pune APMC | APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune APMC News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर बाजार आवारातील प्रशासनाचा वचक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

यामुळे अडते, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालासह जीवितास धोका निर्माण झाला आहे. व्यापारी, अडते चोरांच्या भीतीमुळे तक्रार दाखल करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

बाजार आवारात गेल्या आठवड्यात तीन चार चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. याबाबत पोलिसांनी देखील मौन धारण केले आहे.

बाजार आवारातील फळे-भाजीपाला, गूळ भुसार बाजारात भुरट्या चोरांचा त्रास होता. मात्र आता हे चोर चोरी करण्यास घाबरत नसल्याचे चित्र आहे. बाजारातील दुकानांचे शटर तोडून चोऱ्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

Pune APMC | APMC Election
Pune APMC Election : पुणे बाजार समितीच्या किल्ल्‍या भाजप पुरस्कृत ‘राष्‍ट्रवादी’च्या ताब्यात

दरम्यान, बाजार आवारात गर्दुल्यांचा वावर वाढलाआहे. रात्रीच्या वेळी गाळ्यांवर गांजा, दारू पिऊन सीसीटिव्ही कॅमेरे तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच गूळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडण्यात आली.

Pune APMC | APMC Election
Pune APMC : सभापतिपदी वर्णी कोणाची लागणार?

त्यापैकी एका दुकानातून सुमारे ३० हजार रुपयांची तर, भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली. आठ दिवसांपूर्वी ज्योती पान शॉप फोडून रोख रकमेसह सुमारे ५० ते ६० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत संबंधितांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.

दुसरीकडे फळे भाजीपाला बाजारात गाळ्यांवरून भाजीपाल्यासह आंबा, सफरचंदांच्या पेट्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय बाजारात वाहतूक कोंडी होत आहे. यामध्ये अनेक पुढाऱ्यांच्या बेशिस्त कार्यकर्त्यांच्या वाहनांचा समावेश आहे. अनेक संचालकांच्या नावे कार्यकर्ते बंदी असताना थेट वाहने बाजार आवारात आणत आहेत.

खुनाची वाट पाहणार का?

बाजार आवार हा सध्या गर्दुल्यांचा अड्डा होत आहे. बाजार आवारातील अडते, व्यापारी गर्दुल्यांना हटकण्यास घाबरतात. त्यांच्याकडून एखाद्या खुनाची घटना घडण्याची वाट संचालक मंडळ पाहतेय का? असा प्रश्‍न आडत्यांनी उपस्थित केला आहे.

बाजार आवारात चोऱ्या वाढल्या आहेत. चो‍रट्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतात. चोरांच्या दहशतीमुळे कोणीही कारवाई करत नाही. चोरी केलेला शेतमाल गेटच्या बाहेर नेताना सुरक्षा रक्षक त्यांना हटकत नाहीत. मोठा खर्च करूनही बाजाराची सुरक्षा उपयोगाची आहे का, असा प्रश्न पडतो.
- युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.
चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या गस्तीसाठी फिरते वाहन ठेवले आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com