Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : तुळजापूर तालुक्यातील ३४ तलाव मृतसाठ्याखाली

Water Crisis : तुळजापुर तालुक्यातील ३४ साठवण तलाव, १७ लघु पाटबंधारे प्रकल्प मृत साठ्याखाली आहेत.

Team Agrowon

Tuljapur News : तुळजापुर तालुक्यातील ३४ साठवण तलाव, १७ लघु पाटबंधारे प्रकल्प मृत साठ्याखाली आहेत. सहा लघुपाटबंधारे प्रकल्पात काहीच पाणी शिल्लक नाही. मार्च, एप्रिल, मे तसेच अर्धा जून महिना बाकी आहे. तर उन्हाळ्याच्या झळा आत्तापासून बसण्यास सुरवात झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने उघडीप दिली. त्याचा मोठा फटका यंदा उन्हाळ्यामध्ये सर्व प्रकल्पांना बसलेला दिसून येत आहे. तलावात पाणीसाठा शिल्लक नाही. तालुक्यातील विविध साठवण तलावात, लघुपाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तलावातच पाणीसाठा शिल्लक नसल्याने वेगवेगळ्या उद्धभवातील पाणी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांच्या पशुधनास तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी शिल्लक नसल्याने मोठा फटका बसत आहे. तालुक्यात सावरगाव, सांगवी, माळुंब्रा, पिंपळा, पळस निलेगाव, अपसिंगा, हारणी (काटगाव), या तलावामध्ये ४. ६३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा बुधवार ( ता. २८) पर्यंत उपलब्ध आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

मृत पाणी साठ्याखालीलच पाणी सध्या उपलब्ध आहे. अजून तीन महिन्याच्या कालावधीतील प्रखर उन्हाळा येणे बाकी आहे. जूनपासून होणाऱ्या पावसाळ्यातच पाणीसाठा उपलब्ध होण्यास सुरवात होईल. तालुक्यातील रामधरा, नळदुर्ग मधील बॅरेज क्रमांक एक व दोन येथे पाणीसाठा आहे.

पाटबंधारे प्रकल्प कोरडे

तालुक्यातील मंगरूळ, काटी , दहिवडी, कदमवाडी, केमवाडी, आरळी खुर्द येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पुण॔तः कोरडे आहेत.

तालुक्यात अनेक तलावातील पाणीसाठा अत्यल्प आहे. नागरिकांना येथून पुढील काळात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
सौदागर जाधव, शेतकरी , मंगरूळ तालुका तुळजापूर.
शेतकरी, मजुरांना रोजगार, जनावरांना पिण्याचे पाणी, वैरण अश्या विविध उपाययोजना दुष्काळाृच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून होणे आवश्यक आहे.
धनाजी धोतरकर, अध्यक्ष लोकप्रबोधन संस्था, आरळी बुद्रूक तालुका तुळजापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT