Irrigation Project : जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मंजुरी

Small Irrigation Project Scheme : जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
Nitin Pawar
Nitin PawarAgrowon

Nashik News : तालुक्यातील जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली. या योजनेमुळे तालुक्यातील २२७ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली येणार आहे. योजनेला मान्यता मिळताच अभोणा चौफुलीवर जामशेत परिसरातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला.

दिवंगत आमदार ए. टी. पवार यांनी २०११ मध्ये नाशिकच्या नियोजन व जलविज्ञान कार्यालयाकडून जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्पास पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळवून जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

Nitin Pawar
Krishna Upsa Irrigation : ‘कृष्णा उपसा सिंचन’चे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

मागील १३ वर्षांपासून जामशेत लघु पाटबंधारे योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित होता. याबाबत आमदार नितीन पवार यांनी ओतूरबरोबर जामशेत लघु पाटबंधारे योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन या योजनेचे महत्त्व लक्षात आणून दिले होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागाला तत्काळ अहवाल सादर करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनस्तरावरील अटींची पूर्तता करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २६) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

Nitin Pawar
Agriculture Irrigation : उन्हाळी आवर्तनाला १ मार्चपासून सुरुवात

या योजनेमुळे तालुक्यातील जामशेत, मोहमुख, अंबुर्डी बुद्रूक, अंबुर्डी खुर्द, भगूर्डी, दत्तनगर या परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

जामशेत लघु पाटबंधारे प्रकल्पाचे स्व. ए. टी. पवार यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करावयाचे असल्यामुळे या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
नितीन पवार, आमदार-कळवण सुरगाणा मतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com