Kolhapur Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugarcane Season : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखाने सुरू; साडेपाच लाख टन गाळप

Sugarcane Seson : कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे एकूण १ लाख ४० हजार हेक्टर, तर सांगली जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाच्या नोंदी झाल्या आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Season Kolhapur Sangli : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. यामध्ये एकूण ऊस गाळप साडेपाच लाख टन झाले असून, ५ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. साखर उतारा ८.७० टक्के राहिला आहे. निवडणुकीमुळे १५ दिवस हंगाम पुढे गेला असला तरी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्यात ऊस तोडणीच्या कामाला गती मिळाली आहे.

कोल्हापूर विभागात ४० साखर कारखाने असून, ३० कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे उसाची वाढ खुंटली. मात्र, पाऊस थांबल्यानंतर थंडीमुळे उताऱ्यात वाढ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे एकूण १ लाख ४० हजार हेक्टर, तर सांगली जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाच्या नोंदी झाल्या आहेत.

निवडणुका संपताच कोल्हापूर जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी तर सांगली जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून ८० हजार ऊस तोडणी मजूर बाहेरील जिल्ह्यातून येतात. यापैकी सुमारे ७० हजार मजूर दाखल झाले आहेत. कारखाने हंगाम उशिरा सुरू झाल्याने काही कामगार कर्नाटक व इतर राज्यात गेले आहेत. तर स्थानिकचे ५० हजार कामगार असल्याची माहिती साखर सहसंचालक विभागाकडून देण्यात आली.याचबरोबर यंदा यंत्राद्वारे ऊस तोडणी चांगली होईल, असे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेले कारखाने

सहकारी कारखाने : आजरा शेतकरी, तात्यासाहेब कोरे वारणा, डॉ. डी. वाय. पाटील, जवाहर, छत्रपती राजाराम, शाहू, भोगावती, कुंभी कारखाना. खासगी कारखाने : ओलम अॅग्री, दालमिया भारत पन्हाळा, संताजी घोरपडे शुगर, दौलत इको केन, अथणी शुगर शाहूवाडी, अथणी शुगर भुदरगड.

सांगली जिल्ह्यात सुरू झालेले कारखाने

सहकारी कारखाने : क्रांती कुंडल, राजारामबापू युनिट ४, हुतात्मा किसन अहिर, सोनहिरा, मोहनराव शिंदे, क्रांती कुंडल, विश्वासराव नाईक.

खासगी कारखाने : सद्‌गुरू श्री श्री, दत्त इंडिया, रायगाव शुगर, यशवंत शुगर, श्रीपती शुगर, उदगिरी शुगर, यशवंत शुगर, दालमिया निनाई शुगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT