Turmeric Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Harvesting : हळदीची ३० टक्के काढणी उरकली ; उत्पादनात येतेय १५ ते २० टक्के घट

Turmeric Production : राज्यात यंदाच्या हंगामातील हळद काढणीस गती आली आहे. हळदीची अंदाजे ३० टक्के काढणी उरकली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली ः राज्यात यंदाच्या हंगामातील हळद काढणीस गती आली आहे. हळदीची अंदाजे ३० टक्के काढणी उरकली आहे. मात्र पावसाच्या ओढीचा परिणाम हळद पिकाला बसला आहे. हळद काढणीनंतर उत्पादनात १५ ते २० टक्के घट होत येत आहे, असे हळद उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

राज्यात सेमल, फुले स्वरूपा, वायगाव अशा हळदीच्या वाणांची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामातील हळदीची काढणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. सुरुवातीला हळद काढणीला फारशी गती नव्हती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद काढणीला गती आली आहे. वास्तविक, सांगली, सातारा जिल्ह्यांतील हळद काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात वायगाव या हळदीच्या वाणाची काढणी आटोपली आहे. तर इतर जिल्ह्यांत हळद काढणी सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत.
सध्या हळद काढणीला गती आली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हळदीची काढणी पूर्ण होईल.

राज्यात गतवर्षी १ लाख २ हजार ६६९ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती, तर ३ लाख ६७ हजार ८४२ टन उत्पादन झाले होते. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे हळद लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. परिणामी, राज्यात हळदीची ८८ हजार ३७४ हेक्टरवर लागवड झाली. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ६६९ हेक्टरने घट झाली आहे. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ४५ हजार ७९० टनांनी उत्पादन घट होईल, असा अंदाज मसाला बोर्डाने व्यक्त केला आहे.


सध्या राज्यात हळदीची ३० टक्के म्हणजे २६ हजार ५१५ हेक्टरवरील हळद काढणी उरकली आहे. उत्पादनात १५ टक्के घट होत असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत. दरम्यान, बाजारात आवक कमी अधिक होत असल्याने हळदीला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी हळदीचे १५ गुंठ्यांत १५ क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र यंदा अपुऱ्या पावसाचा फटका बसला आहे. २० गुंठ्यांतील हळद काढली असून, यंदा १५ क्विंटल हळदीचे उत्पादन हाती येईल. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात २० टक्के घट झाली आहे.
- अजित जाधव, हळद उत्पादक,
कुरळप, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT