PDCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank : ‘पीडीसीसी’ बँकेकडून ३० लाख नागरिकांना बँकिंग सुविधा

Banking Facility : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंगला प्राधान्य देण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंगला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे ३० लाख लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पुरविण्यास बँक यशस्वी झालेली असून उर्वरित सर्व नागरिकांपर्यंत येणाऱ्या काळात बँकिंग सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पीडीसीसी बँकेच्या सूत्रांनी दिली.

बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीद्वारे २९० शाखा व ४ विस्तारित कक्षांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील विशेष ग्रामीण भागातील सर्व ग्राहकांना बँकिंग सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बँकिंग क्षेत्रात होणारे नावीन्यपूर्ण बदल व आव्हाने स्वीकारून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुसज्ज व सुरक्षित असे डेटा सेंटर व डी. आर. सेंटर उभारण्यात आले असून सक्षम अशी कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

डिजिटल बँकिंगच्या काळात सक्षम कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे सर्व डिजिटल सेवा व सुविधा बँकेच्या ग्राहकांना अविरत पुरविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक लोकप्रिय व प्रभावी ठरलेली यूपीआय सेवा तसेच मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, छोटे व्यावसायिक,

दुकानदार व व्यापारी ग्राहकांसाठी क्यूआर कोड सुविधा, एटीएम सुविधा, कॅश डिपॉझिट मशिन, पॉस ई-कॉम सुविधा, आरटीजीएस, एनईएफटी, सीटीएस क्लिअरिंग, सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष खातेदारांना पोहचविण्यासाठी डीबीटी सुविधा, एसएमएस अलर्ट, पर्सनलाईज चेकबुक, इंटरनेट बँकिंग व्ह्यू फॅसिलिटी, ऑनलाइन सातबारा प्रिंटिंग सुविधा, ऑन दि. स्पॉट बँकिंग सेवा पुरविण्यासाठी मोबाईल व्हॅन या सुविधांचा समावेश आहे.

सर्व घटकांचे आर्थिक सक्षमीकरण

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील सर्व वर्षाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा व सुविधा देण्याकरिता कायम कटिबद्ध आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून समाजातील सर्व घटकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT