PDCC Bank Pune : उत्कृष्ट सतरा सहकारी संस्थांना बक्षीस वितरण

Excellent Cooperatives : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत गावपातळीवर जवळपास १,३०६ सहकारी संस्था आहेत. यामध्ये २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल संस्थांना बँकेमार्फत जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कायमस्वरूपी ढालीचे वितरण रविवारी (ता.१८) करण्यात आले.
PDCC Bank Pune
PDCC Bank Pune Agrowon
Published on
Updated on


अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत गावपातळीवर जवळपास १,३०६ सहकारी संस्था आहेत. यामध्ये २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल संस्थांना बँकेमार्फत जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कायमस्वरूपी ढालीचे वितरण रविवारी (ता.१८) करण्यात आले. यात शेती संस्था तीन, तालुकास्तरीय १४ व बिगर शेतीमध्ये एक सहकारी संस्थेचा समावेश आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०७ वी अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते ढाली देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात, दिलीप मोहिते, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे, दत्तात्रय येळे, विकास दांगट, संजय जगताप, संभाजी होळकर, निर्मला जागडे, पूजा बुट्टेपाटील, रणजित तावरे, सुरेश घुले, कार्यलक्षी संचालक राजेंद्र शितोळे, शासन प्रतिनिधी प्रकाश जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

PDCC Bank Pune
Ajit Pawar : पुणे जिल्ह्यातील १७ उत्कृष्ट सहकारी संस्थांना ढाली

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १,३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. या कामामध्ये उल्लेखनीय कामे अनेक संस्था करत आहेत. गेल्या वर्षी जिल्हा स्तरावर बागायती गटामध्ये बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील प्रतिभा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही उल्लेखनीय संस्था ठरली आहे. जिरायती गटामध्ये पुरंदर तालुक्यातील परिंचे- वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, डोंगराळ गटातील वेल्हा तालुक्यातील पानशेत येथील ओसाडे-निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था उत्कृष्ट ठरल्या आहेत.

तालुका स्तरावर उत्तम केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एका संस्थेची निवड करून सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील लोणीधामणी शाखेअंतर्गत असलेली माऊली कृपा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सन्मान करण्यात आला. बारामतीतील बारामती मुख्य शाखेअंतर्गत काशी विश्वेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, भोर तालुक्यातील नसरापूर शाखेअंतर्गत जानुबाई विविध कार्यकारी सहकारी संस्था, दौंड तालुक्यातील केडगाव शाखेअंतर्गत नागेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था, हवेतील लोहगाव शाखेअंतर्गत इंद्रायणी विविध कार्यकारी सहकारी संस्था, इंदापूर तालुक्यातील शेळगाव शाखेअंतर्गत श्री हनुमान शेळगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था, लासुर्णे शाखाअंतर्गत मोहोळकर गुरुजी विविध कार्यकारी सहकारी संस्था, जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक शाखेअंतर्गत शिरोलीतर्फे आळे विविध कार्यकारी सहकारी संस्था, खेड तालुक्यातील मरकळ शाखेअंतर्गत गोलेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था, मावळ तालुक्यातील काले कॉलनी शाखेअंतर्गत करुंज विविध कार्यकारी सहकारी संस्था, पुरंदरमधील जेजुरी शाखेअंतर्गत बेलसर निळुंज विविध कार्यकारी सहकारी संस्था, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर शाखेअंतर्गत शिक्रापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था, वेल्हा तालुक्यातील विंझर शाखेअंतर्गत विंझर विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा समावेश आहे. बिगरशेती सहकारी संस्थांमध्ये इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा समावेश आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com