PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’कडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अर्थसाह्य

Finance for Tractors : ‘‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शेतकऱ्यांसाठी बॅंकेने अर्थसाह्य करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत.
Agriculture Tractor
Agriculture TractorAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शेतकऱ्यांसाठी बॅंकेने अर्थसाह्य करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. यामध्ये खरीप हंगामात ट्रॅक्टरसाठी बॅंकेकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाभ मुळशी तालुक्यातील गडदावणे येथील दोन शेतकऱ्यांना देण्यात आला,’’ अशी माहिती पीडीसीसी बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरेश नांगरे यांनी दिली.

सध्या खरीप हंगाम वेगात सुरू आहे. शेतकऱ्यांना खरिपात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात गरज असते. गडदावणे येथील शेतकरी शिवाजी ओंबासे व चंद्रकांत ओंबासे या दोन्ही बंधूंना ट्रॅक्टर खरेदीसाठी बॅंकेने अर्थसाह्य केले. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅक्टर देण्यात आला. बॅंकेकडून ट्रॅकरसाठी कोटेशनच्या ८५ टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते.

Agriculture Tractor
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

पुणे जिल्हा बँकेकडून दोन शेतकऱ्यांनी ९ लाख १० हजार १९० रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. शेतकऱ्यांना सात लाख ४८ हजार रुपयांचे पौड येथील पीडीसीसी बॅंकेअंतर्गत असलेल्या शाखेकडून कर्ज दिले आहे.

उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. अंबडवेद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव प्रथमेश ओंबासे यांच्या वाढदिवसानिमित्त ओंबासे परिवाराने या ट्रॅक्टरची खरेदी केली. या वेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ज्येष्ठ नेते रमेश नांगरे, बॅंकेचे शाखाधिकारी बाबा ववले, अजय केदारी, अमर अमराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माउली कांबळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com