Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : धान खरेदी गैरव्यवहारातील प्रादेशिक व्यवस्थापक बडतर्फ

Paddy MSP : आधारभूत धान्य खरेदींतर्गत २०२२-२३ मध्ये शहापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पडशीळ, साकडा, न्याहाडी, खांडस या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवरील खरेदीत गैरव्यवहार झाला होता.

Team Agrowon

Nashik News : आदिवासी विकास महामंडळातील पालघर येथील धान खरेदीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.

त्यांच्याकडे एकूण २८ कोटींची वसुली करण्याचे आदेशही त्यांनी दिले. जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयात गांगुर्डे हे प्रादेशिक व्यवस्थापकपदावर कार्यरत होते. आधारभूत धान्य खरेदींतर्गत २०२२-२३ मध्ये शहापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पडशीळ, साकडा, न्याहाडी, खांडस या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवरील खरेदीत गैरव्यवहार झाला होता.

त्यात ८६ हजार ६३४ क्विंटल धान व दोन लाख १७ हजार ८९७ नग बारदानाचा अपहार झाल्याची तक्रार होती. निवृत्त प्रकल्प संचालक वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली.

या समितीच्या अहवालानुसार २७कोटी ९१ लाख ५६ हजार २३२ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्या आधारे गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

गांगुर्डे यांच्यावरील आक्षेप

सातबारा उतारा नसताना धान्य खरेदी

बनावट बँक गॅरंटी घेणे

खरेदी केंद्रावर नियंत्रण न ठेवणे

मुख्यालयात उपस्थिती नसणे

अनधिकृत धान खरेदीकडे दुर्लक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT