Mahavitaran Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : मराठवाड्यात वीजचोरीप्रकरणी २८ कोटींवर दंडाची रक्कम वसूल

Electricity Theft Fine : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ४ कोटी १७ लाख २१ हजार ३४४ युनिट वीज चोरीप्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ४,६९८ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात ३,७०४ मीटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यामध्ये ४ कोटी १७ लाख २१ हजार ३४४ युनिट वीज चोरीप्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली. तर २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. त्यामधून ही माहिती समोर आली.

वीज चोरीची रक्कम लाख रुपयांमध्ये

वीज पथक ग्राहक वीजचोरी रक्कम (लाखांत)

छ. संभाजीनगर शहर ७४४ ६६०.०६

छ. संभाजीनगर ग्रा ३४९ ३२५.३६

जालना ४४० ४३८.९७

संभाजीनगर परिमंडल १,५३३ १४२४.३९

बीड २७९ २७८.५४

धाराशिव २५१ ३०१.८४

लातूर ३६८ ३४५.५८

लातूर परिमंडल ८९८ ९२५.९६

नांदेड ३१३ २०३.९९

हिंगोली २७१ २०४.०२

परभणी ६८९ ४३८.७५

नांदेड परिमंडल १,२७३ ८४६.७६

मराठवाडा एकूण ३,७०४ ३,१९७.११

आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
राहुल गुप्ता, महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT