Sindhudurg News: अतिथंडी, ढगाळ वातावरण आणि प्रचंड धुके यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू पिकाला आलेला मोहर करपला आहे. आंबा पिकामध्ये १० टक्के तर काजू पिकांमध्ये १५ ते २० टक्केच उत्पादन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. या संदर्भातील अहवाल तालुका कृषी विभागाकडून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे..जिल्ह्यात या वर्षी आंबा, काजूला मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. परंतु दीड-दोन महिने स्थिरावलेली थंडी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि सततचे धुके यामुळे आंबा, काजू पिकाला आलेला मोहर करपला आहे. आंब्याला दहा टक्के, तर काजूला आलेल्या मोहरापैकी केवळ १५ ते २० टक्केच फळधारणा झालेली आहे. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत..Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम.कीटकनाशके, बुरशीनाशके आणि खतांच्या वाढलेल्या किमती तसेच वाढलेला मजूर खर्च यामुळे आंबा, काजू उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंबा आणि काजू उत्पादकांनी शासनाकडे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे..Crop Damage Survey : नाशिक जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण.देवगड, वेंगुर्ला, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यांतील शेतकरी एकवटले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचा देवगड येथे मेळावा झाला. त्यांनी १२ मार्चपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे..दरम्यान, कृषी विभागाने जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. पिकांचे नेमके किती टक्के नुकसान झाले आहे, याचा अहवाल तालुका कृषी विभाग जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला देणार आहे. त्यानंतर हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.